रणबीर कपूरने जागवल्या राज कपूर यांच्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 10:05 IST2017-05-08T04:35:14+5:302017-05-08T10:05:14+5:30
रणबीर कपूरने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर एक व्हिडिओ शेअर करून राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या व्हिडिओत आपल्याला छोटीशी करिना, रणबीर, रणबीरची बहीण रिधिमा आणि राज कपूर पाहायला मिळत आहेत.
.jpg)
रणबीर कपूरने जागवल्या राज कपूर यांच्या आठवणी
र ज कपूर हे बॉलिवूडमधले एक मोठे नाव. एक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक म्हणून त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची अभिनयाची परंपरा त्यांची मुले ऋषी कपूर, रणधीर कपूर यांनी पुढे नेली. त्यांनी देखील अभिनयक्षेत्रात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची तिसरी पिढी म्हणजेच रणधीर कपूर यांच्या मुली करिश्मा कपूर, करिना कपूर आणि ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर सध्या इंडस्ट्रीत आपले चांगलेच नाव कमावत आहे. करिना कपूर काही वर्षांपूर्वी रँड्यूज विथ सिमी गरवाल या कार्यक्रमात आली होती. या कार्यक्रमात कलाकार त्यांच्या कारकिर्दीविषयी आणि त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी गप्पा मारत असत. या कार्यक्रमात करिनाला एक खूप चांगले सरप्राइज मिळाले होते.
सिमी गरवाल यांनी करिनाच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक व्हिडिओ या कार्यक्रमात दाखवला होता. या व्हिडिओत आपल्याला छोटीशी करिना, रणबीर, रणबीरची बहीण रिधिमा आणि राज कपूर पाहायला मिळाले होते. करिना या व्हिडिओत आपल्या आजोबांचे खूप लाड करत असताना आपल्याला दिसली होती तर या व्हिडिओत रणबीरला तू छान छान कपडे घालून ये असे राज कपूर सांगत होते. पण मी आंघोळ केल्यावरच चांगले कपडे घालेन असे तो आपल्या आजोबांना सांगत होता.
रणबीर कपूरने हा व्हिडिओ नुकताच त्याच्या फेसबुक पेजवर शेअर करून राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काहीच तासांमध्ये हा व्हिडिओ चाळीस हजारांहूनही अधिक लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.