ऐकलं का...मराठमोळ्या गायकाने खरेदी केली रेंज रोव्हर; किंमत तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:16 IST2024-08-05T12:43:25+5:302024-08-05T13:16:53+5:30

राहुल वैद्यने रेंज रोव्हर विकत घेतली आहे.  

Rahul Vaidya Bought luxury Range Rover car worth ₹4 crore Disha Parmar | ऐकलं का...मराठमोळ्या गायकाने खरेदी केली रेंज रोव्हर; किंमत तुम्हाला माहिती आहे का?

ऐकलं का...मराठमोळ्या गायकाने खरेदी केली रेंज रोव्हर; किंमत तुम्हाला माहिती आहे का?

Rahul Vaidya Bought New Car : लोकप्रिय गायक आणि विविध रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेल्या मराठमोळ्या राहुल वैद्यचा (Rahul Vaidya) एक मोठा चाहतावर्ग आहे. राहुलने आतापर्यंत अनेक हिट गाणी दिली आहेत. तो  नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.  सध्या ज्या कारणामुळे चाहत्यांमध्ये राहुल वैद्यची चर्चा होत आहे, ते म्हणजे त्याची नवीकोरी आलिशान गाडी. राहुल वैद्यने रेंज रोव्हर (Rahul Vaidya Bought Range Rover) विकत घेतली आहे.  

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिशान अशी काळ्या रंगाची कार ही अगदी स्टायलिश दिसून आली.  राहुलने गाडीचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, "आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि मुलीच्या नशिबाने नवीन कार खरेदी केली". या फोटोंमध्ये राहुल ब्लॅक जीन्स, व्हाईट टी- शर्ट आणि जॅकेट वेअर केले होते. तर दिशा ही व्हाईट फ्लोरल प्रिंटेड फुल्ल गाऊनमध्ये सुंदर दिसत होती. राहुलवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


रेंज रोव्हर (Range Rover) गाडीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ब्लॅक मॅट रंगाच्या या गाडीला स्पेशल व्हेईकल एडिशन अंतर्गत तयार करण्यात आले आहे. ही एक लक्झिरिअस कार आहे. या रेंज रोव्हर SV मध्ये नवीन फ्रंट बंपर आणि एक five-bar ग्रिल या कारला एक वेगळा लूक देतात. रेंज रोव्हर SV चे इंटिरिअर एकदम खास आहे.  सीटवर SV चा लोगो पण तयार करण्यात आला आहे. या कारचा सर्वाधिक वेग ताशी 290 किमी आहे. या कारची किंमत तब्बल ४ कोटी रुपये असल्याचं बोलले जात आहे.

Web Title: Rahul Vaidya Bought luxury Range Rover car worth ₹4 crore Disha Parmar