Nana Patekar : सुख म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं...? नाना पाटेकरांचा हा गोड व्हिडीओ पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 11:56 IST2022-09-07T11:55:35+5:302022-09-07T11:56:31+5:30

Nana Patekar : होय, लहान मुलांसोबत नाना सुद्धा लहान होऊन रमतात. याचा प्रत्यय देणारा हा व्हिडीओ प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी शेअर केला आहे.

rahul deshpande shares video of nana patekar with daughter renuka | Nana Patekar : सुख म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं...? नाना पाटेकरांचा हा गोड व्हिडीओ पाहिलात का?

Nana Patekar : सुख म्हणजे यापेक्षा वेगळं काय असतं...? नाना पाटेकरांचा हा गोड व्हिडीओ पाहिलात का?

नाना पाटेकर (Nana Patekar) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. नाना हे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार. वरवर फटकळ वाटत असणारे नाना आतून अतिशय मृदू आहेत. रोजच्या आयुष्यात जगताना ते कधीही स्वत:चं स्टारडम मिरवत नाहीत. त्यांच्या मनमिळावू, गोड स्वभावाची अनेक उदाहरणं, अनेक किस्से आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. होय, लहान मुलांसोबत नाना सुद्धा लहान होऊन रमतात. याचा प्रत्यय देणारा हा व्हिडीओ प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी शेअर केला आहे.

या व्हिडीओत राहुल देशपांडे यांची चिमुकली लेक रेणुका आणि नाना पाटेकर यांची चांगलीच गट्टी जमलेली दिसतेय. नाना चिमुकल्या रेणुकाला झाडावर चढायला शिकवत आहेत. तिला झाडावर चढण्याचं कसब शिकवत आहेत. नानांच्या मदतीने रेणुका झाडावर चढते आणि तिला झाडावर चढलेलं बघून, मस्तच... हे बघा आमच्या झाडाला काय वेगवेगळी फळं आली आहेत, असं नाना हसत हसत म्हणताना दिसतात. व्हिडीओमध्ये रेणुका नानांना ‘नाना काका’ अशी प्रेमळ हाक मारताना दिसतेय.
‘साधं सुख...सुख म्हणजे नक्की काय असतं’, असं हा व्हिडीओ शेअर करताना राहुल देशपांडे यांनी लिहिलं आहे.

नाना आणि  रेणुकाचा हा व्हिडीओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.     रेणुका आणि नानांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

Web Title: rahul deshpande shares video of nana patekar with daughter renuka