दोनच ओळीत राहुल देशपांडेंनी दिली 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबद्दल प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:46 PM2024-03-28T12:46:46+5:302024-03-28T12:47:30+5:30

राहुल देशपांडेेंनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून मोजक्या शब्दात त्यांची प्रतिक्रिया मांडली आहे

Rahul Deshpande commented on Swatantryaveer Savarkar movie randeep hooda | दोनच ओळीत राहुल देशपांडेंनी दिली 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबद्दल प्रतिक्रिया, म्हणाले...

दोनच ओळीत राहुल देशपांडेंनी दिली 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबद्दल प्रतिक्रिया, म्हणाले...

रणदीप हूडाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात रणदीप हूडाने वीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार रणदीपच्या सिनेमाचं कौतुक करत आहेत. अशातच मराठमोळे संगीतकार, गायक राहुल देशपांडेंनी अगदी मोजक्या शब्दात 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं कौतुक केलंय.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून राहुल देशपांडेंनी सोशल मीडियावर फोटो शेअर केलाय आणि लिहीलंय की, "शतजन्म शोधिताना शत आर्ती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या ! Take a bow  रणदीप हूडा." राहुल देशपांडेनी सावरकरांनी लिहीलेल्या काव्याच्या ओळी वापरुन रणदीप हूडाच्या अभिनयाचं आणि सिनेमाचं कौतुक केलंय. राहुल यांनाही सिनेमा आवडल्याचं दिसतंय.  

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाबद्दल सांगायचं तर,  क्रांतीकारक वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. रणदीप हूडा सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय अंकिता  लोखंडे. राजेश खेरा, अमित सियाल आदी कलाकार सुद्धा महत्वाच्या  भूमिकेत झळकत आहेत. रणदीपनेच या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. हा सिनेमा हिंदीसह मराठी भाषेतही रिलीज झालाय.

Web Title: Rahul Deshpande commented on Swatantryaveer Savarkar movie randeep hooda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.