रहमानला जपानी संस्कृती पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 15:23 IST2016-06-02T09:53:43+5:302016-06-02T15:23:43+5:30
संगीतकार ए. आर. रहमान यांना आशियाई संस्कृतीतील योगदानाबद्दल ग्रँड फुकोका प्राईझ २०१६ पुरस्कार जाहीर झाला. या कार्यक्रमाचा भाग म्हणून ...

रहमानला जपानी संस्कृती पुरस्कार
स गीतकार ए. आर. रहमान यांना आशियाई संस्कृतीतील योगदानाबद्दल ग्रँड फुकोका प्राईझ २०१६ पुरस्कार जाहीर झाला. या कार्यक्रमाचा भाग म्हणून ए. आर. रहमान हे ‘फ्रॉम द हार्ट: द वर्ल्ड आॅफ ए. आर. रहमान्स म्युझिक’ याबाबत व्याख्यान देणार आहेत. ४९ वर्षीय आॅस्कर विजेत्या रहमान यांना अमेथ आर ओकॅम्पो (अकॅडमी पुरस्कार) आणि पाकिस्तानचा यास्मीन लारी (कला व संस्कृती) पुरस्कार मिळाला आहे. १९९० पासून या पुरस्काराची सुरुवात झाली. वैयक्तिक, संघटना आणि संस्थांना आशियाई संस्कृतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल गौरविण्यात येते. रहमान यांनी मणी रत्नम यांच्या ‘रोजा’ या तमिळ चित्रपटापासून सुरुवात केली. १९९५ साली राम गोपाल वर्मा यांच्या रंगीलापासून त्यांना हिंदी सिनेमात संधी मिळाली. बॉम्बे, दिल से, ताल या चित्रपटातील त्यांचे संगीत गौरविण्यात आले.