कपूर नव्हे तर भट कुटुंबातील 'या' व्यक्तीसारखी दिसते राहा, महेश भट यांची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 13:03 IST2024-02-26T12:53:10+5:302024-02-26T13:03:31+5:30

महेश भट यांनी नातीचा चेहरा कोणाशी मिळताजुळता आहे याचा खुलासा केलाय. त्यांची एक नोट सध्या व्हायरल होत आहे.

Raha kapoor has resemblance with this person in bhatt family Mahesh Bhat revealed | कपूर नव्हे तर भट कुटुंबातील 'या' व्यक्तीसारखी दिसते राहा, महेश भट यांची पोस्ट व्हायरल

कपूर नव्हे तर भट कुटुंबातील 'या' व्यक्तीसारखी दिसते राहा, महेश भट यांची पोस्ट व्हायरल

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटची (Alia Bhat)  लेक राहा कपूर (Raha Kapoor)  सोशल मीडियावर आतापासूनच स्टार झाली आहे. जेव्हापासून तिची एक झलक पाहायला मिळाली तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये ती कोणासारखी दिसते याची चर्चा सुरु झाली होती. राहाचे निळे डोळे, गोरीपान त्वचा यामुळे अनेकांना ऋषी कपूर यांचीच आठवण आली. राहा तिच्या आजोबांवरच गेली आहे असंच अनेकांनी सांगितलं. पण आता महेश भट (Mahesh Bhat) यांनी नातीचा चेहरा कोणाशी मिळताजुळता आहे याचा खुलासा केलाय. त्यांची एक नोट सध्या व्हायरल होत आहे.

महेश भट यांची मुलगी आणि आलिया भटची सावत्र बहीण पूजा भटने (Pooja Bhat) नुकताच ५२ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाला वडील महेश भट यांनी एक खास नोट दिली. ते लिहितात, "पूजा मी गनात्रा मॅटर्निटी हॉस्पिटलच्या मंद प्रकाशातील गल्लीतून हळूहळू चालत जात आहे. सूर्यकिरणामुळे खरा प्रकाश मिळत आहे. जसा मी काचेचा दरवाजाजवळ पोहोचतो, माझी नजर तुझ्यावरच खिळते. तू एका पाळण्यात आहेस. त्याक्षणी मी तुझ्या रागाने लाल झालेल्या गुबगुबीत गालांकडे बघतच राहिलो. तेव्हापासूनच तू आयुष्यात हळहळू पुढे गेलीस, अडखळलीस पण पाय नेहमी जमिनीवर ठेवलेस. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू घडत गेली आहेस. मला नेहमीच आपल्या लाडक्या राहामध्ये तूच दिसतेस. तोच निरागसपणा आणि आयुष्य जगण्याचा उत्साह दोघींमध्येही अगदी सारखाच दिसून येतो.असंच आयुष्य जगत राहा त्यातच जगण्याचं सार आहे. हॅपी बर्थडे."

महेश भट यांची अशी पोस्ट वाचून कोणतीही लेक भावूक होईल. पूजा भटने वडिलांची ही नोट सोशल मीडियावर शेअर केली आहे. चाहत्यांनीही बापलेकीच्या नात्याला खूप प्रेम दिलं आहे. तसंच कपूर कुटुंबियांची लाडकी राहा तिच्या मावशीसारखी दिसते असंही महेश भट यांनी म्हटलं आहे.

Web Title: Raha kapoor has resemblance with this person in bhatt family Mahesh Bhat revealed