पोस्टरनंतर ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या टीजरने घातला धुमाकूळ; पहा करिष्मा शर्माच्या बोल्ड अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 14:24 IST2017-09-12T12:59:11+5:302017-09-13T14:24:17+5:30

भारतीय डिजिटल प्लॅटफॉर्मममध्ये आतापर्यंतचे सर्वात बोल्ड पोस्टर ठरलेल्या ‘रागिनी एमएमएस २.२’च्या टीजरने धुमाकूळ घातला आहे.

Ragini MMS Returns followed by posters; See Karishma Sharma's bold pay! | पोस्टरनंतर ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या टीजरने घातला धुमाकूळ; पहा करिष्मा शर्माच्या बोल्ड अदा!

पोस्टरनंतर ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या टीजरने घातला धुमाकूळ; पहा करिष्मा शर्माच्या बोल्ड अदा!

ल्डनेसच्या सर्व सीमा हद्दपार करणाºया पोस्टरनंतर ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’चा टीजर रिलीज करण्यात आला आहे. पोस्टरप्रमाणेच टीजरही बोल्ड असून, करिष्मा शर्माच्या हॉट बिकिनीतील अदा घायाळ करणाºया आहेत. जर तुम्ही टीजर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की, ‘रागिनी एमएमएस’ची सीरिज किती बोल्ड आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलेले पोस्टर भारतीय डिजिटल प्लॅटफॉर्ममधील आतापर्यंतचे सर्वात बोल्ड पोस्टर ठरले आहे. यामध्ये करिष्मा शर्मा आणि सिद्धार्थ गुप्ताच्या व्यतिरिक्त रिया सेन आणि निशांत मल्कानी बघावयास मिळणार आहेत. 

जेव्हा वेबसीरिजचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला, तेव्हा प्रेक्षकांनी त्यास प्रचंड प्रतिसाद दिला. आता पोस्टरप्रमाणेच टीजरलाही प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘रागिनी एमएमएस २.२’ सीरिजचा हा तिसरा चित्रपट आहे. पहिल्या भागात राजकुमार राव आणि कॅनाज मोटीवाला बघावयास मिळाले होते. त्यानंतर ‘रागिनी एमएमएस-२’मध्ये सनी लिओनी तिच्या सौंदर्याच्या अदा दाखविताना बघावयास मिळाली. 
 

दरम्यान, रिलीज झालेल्या टीजरमध्ये सुरुवातीलाच ‘रागिनी एमएमएस’चा सीन दाखविण्यात आला. त्यानंतर ‘रागिनी एमएमएस-२’चाही सीन दाखविण्यात आला. त्यानंतर मात्र सर्व काही करिष्माच दिसत असून, तिच्या बोल्ड अदा घायाळ करणाºया आहेत. ४० सेकंदांच्या या टीजरमध्ये करिष्मा बिकिनीमध्ये अतिशय बोल्ड असे सीन्स देताना बघावयास मिळत आहे. ती खूपच बोल्ड दिसत असून, प्रेक्षकांकडून तिच्या या सेक्सी अदा चांगल्याच पसंत केल्या जात आहेत. 

मात्र या सीरिजची आतापर्यंतची प्रेक्षकांना बुचकळ्यात टाकणारी बाब म्हणजे पोस्टर आणि टीजरमध्येही रिया सेनला स्थान दिले गेले नाही. वास्तविक रियाने पहिल्या भागात अतिशय बोल्ड सीन्स देऊन खळबळ उडवून दिली होती. अशात तिला टीजरमध्ये स्थान दिले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होत; परंतु तसे घडले नाही. वास्तविक वेबसीरिजमध्ये रिया एक प्रमुख भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. वेबसीरिजचे ट्रेलर १४ सप्टेंबर रोजी रिलीज केले जाणार आहे. 

Web Title: Ragini MMS Returns followed by posters; See Karishma Sharma's bold pay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.