Ragini MMS 2.2 First Look Out : एकता कपूरच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये कोण असेल नवा हॉट चेहरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 18:30 IST2017-09-08T12:37:19+5:302017-09-08T18:30:36+5:30

एकता कपूरने ‘रागिनी एमएमएस २.२’चा फर्स्ट लूक रिलीज केला असून, यामध्ये दिसत असलेली अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. कोण असेल ही अभिनेत्री?

Ragini MMS 2.2 First Look Out: Who will be the new hot face of Ekta Kapoor's 'WebSite'? | Ragini MMS 2.2 First Look Out : एकता कपूरच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये कोण असेल नवा हॉट चेहरा?

Ragini MMS 2.2 First Look Out : एकता कपूरच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये कोण असेल नवा हॉट चेहरा?

ागिनी एमएमएस २.२’चा फर्स्ट लूक समोर आला असून, पुन्हा एकदा त्यात हॉटनेसचा तडका लावलेला दिसत आहे. निर्माता तथा दिग्दर्शक एकता कपूरने शुक्रवारी एक फोटो शेअर करताना लिहिले की, ‘अंदाज लावा... कोण परत येत असेल?... फोटोत कोण दिसत आहे?’ चाहत्यांनीही एकताने सांगितल्यानुसार अंदाज लावीत हा फोटो ‘रागिनी एमएमएस २.२’चा फर्स्ट लूक असल्याचे म्हटले. मात्र फोटोत दिसत असलेली अभिनेत्री कोण याचा अंदाज लावणे चाहत्यांना शक्य झाले नाही. दरम्यान, याबाबतचा खुलासा आम्ही करणार असून, एकताच्या या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री करिष्मा शर्मा दिसणार आहे. 

कदाचित तुम्हाला असे वाटले असेल की, या वेबसिरीजमध्ये नवा चेहरा बघावयास मिळेल. परंतु असे घडले नसून, करिष्माचेच पुन्हा एकदा चाहत्यांना जलवे बघावयास मिळणार आहेत. या अगोदर करिष्माला आपण टीव्हीवर बघितले आहे. होय, तुम्ही बरोबर ओळखले. एकता कपूरच्या ‘ये हैं मोहब्बतें’ या मालिकेत रैनाची भूमिका साकारणारी करिष्मा या वेबसिरीजमध्ये बघावयास मिळणार आहे. करिष्माने ‘ये हैं मोहब्बतें’ या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारली. याव्यतिरिक्त करिष्माने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेसह ‘प्यार का पंचनामा-२’ या चित्रपटातही काम केले आहे.  
 

करिष्मा सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच हॉट फोटो शेअर करीत असते. दरम्यान, या वेबसिरीजच्या फर्स्ट लूकमध्ये करिष्मा कमालीची हॉट दिसत आहे. यामध्ये ती बिकिनी अवतारात असून, चाहत्यांना आता या वेबसिरीजची प्रतीक्षा लागली आहे. 

Web Title: Ragini MMS 2.2 First Look Out: Who will be the new hot face of Ekta Kapoor's 'WebSite'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.