राजीव खंडेलवालने घेतली फिरकी! रागिणी खन्नाने संतापून सोडला शो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 10:04 IST2018-07-03T10:03:07+5:302018-07-03T10:04:46+5:30

‘जज्बात’ हा टॉक शो सध्या गाजतोय. या शोमध्ये आलेल्या सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत राजीव खंडेलवाल थट्टामस्करी करताना दिसतो. पण अलीकडे हीच थट्टामस्करी राजीवला चांगलीच महागात पडली. 

ragini khanna walks out from rajeev khandelwal show juzzbaat in anger | राजीव खंडेलवालने घेतली फिरकी! रागिणी खन्नाने संतापून सोडला शो!!

राजीव खंडेलवालने घेतली फिरकी! रागिणी खन्नाने संतापून सोडला शो!!

राजीव खंडेलवालचा ‘जज्बात’ हा टॉक शो सध्या गाजतोय. या शोमध्ये आलेल्या सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत राजीव खंडेलवाल थट्टामस्करी करताना दिसतो. पण अलीकडे हीच थट्टामस्करी राजीवला चांगलीच महागात पडली. होय, राजीवने केलेली थट्टा एका सेलिब्रिटी गेस्टच्या इतकी जिव्हारी लागली की, ती सेलिब्रिटीगेस्ट शो मध्येच सोडून संतापाने निघून गेली. आता ही सेलिब्रिटी गेस्ट कोण, तर रागिणी खन्ना.


होय, करण व्ही़. ग्रोव्हर त्याची मैत्रिण रागिणी खन्नासोबत या शोमध्ये पोहोचला होता. शो सुरू झाला आणि हास्यविनोदही. याचदरम्यान राजीवने रागिणीला एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओतील व्यक्तिचा चेहरा ब्लर केलेला होता. व्हिडिओतील ही व्यक्ती रागिणीसंदर्भात बोलत होती. मी रागिणीवर खूप नाराज आहे. कारण तिने मला धोका दिला...वगैरे वगैरे व्हिडिओतील ही व्यक्ती बोलली. हा व्हिडिओ पाहून रागिणीला मोठा धक्का बसला आणि तिने राजीवला व्हिडिओ बंद करण्यास सांगितला. पण राजीवने ऐकेचना. राजीवने व्हिडिओ सुरुचं ठेवला. काही मिनिटांनंतर हा व्हिडिओ खोटा होता, ही नुसती थट्टा होती, असे त्याने रागिणीला सांगितले. पण तोपर्यंत रागिणीचा पारा चढला होता. ती काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. ती तडक उठली अन् सेटवरून निघून केली. तिचे हे ‘रौद्ररूप’ पाहून राजीवही टेन्शनमध्ये आला. राजीवने तिच्या मनधरणीचे बरेच प्रयत्न केलेत. पण रागिणी मानली नाही. मग काय, राजीव पुरता हतबल झाला. अर्थात काही क्षणात रागिणी पुन्हा सेटवर आली आणि केवळ राजीवचं नाही तर मी सुद्धा फिरकी घेऊ शकते, असे म्हणून जोरजोरात हसू लागली. एकंदर काय तर आधी राजीवने तिचा ‘पोपट’ केला आणि नंतर रागिणीने राजीवचा. हे बघून सेटवर सगळीकडेचं खसखस पिकली.
यापूर्वी राजीवने कॉमेडियन भारतीसोबत असेच काही केले होते. तिच्यासोबत राजीवने बेशुद्ध होण्याचे नाटक केले होते. राजीव अचानक बेशुद्ध पडलेला पाहून भारती प्रचंड घाबरली होती. नंतर राजीवने आपली फिरकी घेतल्याचे भारतीला कळले होते.

 

 

 

Web Title: ragini khanna walks out from rajeev khandelwal show juzzbaat in anger