'मी त्यांची मुलगी नाही त्यामुळे...'; करिअरमध्ये मामाचा फायदा झाला का? रागिनीने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 01:47 PM2024-02-18T13:47:16+5:302024-02-18T13:48:08+5:30

Ragini khanna: रागिनी ही गोविंदाची भाची आहे. त्यामुळे तिच्या करिअरमध्ये गोविंदाचा किती फायदा झाला यावर तिने भाष्य केलं आहे.

ragini-khanna-says-being-govinda-niece-didnt-help-in-career-and-that-she-is-not-his-daughter | 'मी त्यांची मुलगी नाही त्यामुळे...'; करिअरमध्ये मामाचा फायदा झाला का? रागिनीने दिलं उत्तर

'मी त्यांची मुलगी नाही त्यामुळे...'; करिअरमध्ये मामाचा फायदा झाला का? रागिनीने दिलं उत्तर

छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली मालिका म्हणजे 'ससुराल गेंदा फूल'. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत अभिनेत्री रागिनी खन्ना (ragini khanna) हिने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु, या मालिकेनंतर रागिनी फार मोजक्या मालिकांमध्ये झळकली. अलिकडेच तिने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिचा मामा अर्थात अभिनेता गोविंदा याच्याविषयी भाष्य केलं.  मामा सुपरस्टार असूनही त्याचा करिअरसाठी काहीच फायदा झाला नाही, असं तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं.

'गोविंदाची मुलं टीन आहुजा आणि यशवर्धन आहुजा हे कदाचित टीव्हीवर काम करणार नाहीत. पण, मी त्याची भाची होते त्यामुळे टेलिव्हिजनवर काम करण्यास नकार द्यायचा मला विशेषाधिकार मला नव्हता,' असं तिने यावेळी सांगितलं.

नेमकं काय म्हणाली रागिनी?

"गोविंदाची भाची असणं तिच्यासाठी फायदेशीर ठरलं का?' असा प्रश्न तिला विचारण्यात आसा होता. त्यावर, नाही. ते फार मोठे स्टार आहेत.  सगळ्यात मुख्य म्हणजे मी त्यांची मुलगी नाही.  त्यामुळे माझ्या करिअरमध्ये त्यांची मदत झाली नाही. मला नमू ( टीना आहुजा) आणि यश (यशवर्धन आहुजा) हे दोघेही आवडतात. माझं त्यांच्यावर फार प्रेम आहे. आम्ही एकमेकांचे चांगेल मित्रदेखील आहोत. पण, कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे त्या दृष्टीकोनातून पाहिलं जात नाही. नमू-यश टिव्हीवर जातील का? नाही. पण, रागिनी जाईल. तुम्हाला या गोष्टीतला फरक कळतोय ना? मला कायम वाटतं की हे चित्र बदलावं", असं रागिनी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझे गोविंदाच्या कुटुंबाशी, मावसभाऊ कृष्णा अभिषेक, आरती सिंह यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन हँगआऊट करत नाही, आम्ही बाहेर जात नाही. विशेष म्हणजे कोविड असल्यामुळे गेल्या ४ वर्षात मी चिची मामाला (गोविंदा) भेटले सुद्धा नाही. पण, माझं मामाच्या घरी येणं-जाणं असतं. आमच्या छान गप्पा होतात. प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक दिवाळीत, वाढदिवसाला त्यांच्याशी बोलते. कृष्णा व आरतीशी भाऊबीज, रक्षाबंधन व दिवाळीत भेट होते. माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत."

दरम्यान, रागिनीने ससुराल गेंदा फूल, 'राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी' , कॉमेडी नाईट्स लाइव्ह, यांसारख्या मालिका, रिअॅलिटी शोमध्ये तिने काम केलं आहे.

Web Title: ragini-khanna-says-being-govinda-niece-didnt-help-in-career-and-that-she-is-not-his-daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.