‘रोडिज’ फेम रघुरामला मिळाले नवे प्रेम! सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 15:31 IST2018-03-27T10:01:46+5:302018-03-27T15:31:46+5:30
एमटीव्हीचा लोकप्रीय शो ‘रोडिज’चा माजी परिक्षक रघुराम अलीकडे भावूक झालेला दिसला होता. होय, रघुराम व त्याची पत्नी सुगंधा २०१६ ...

‘रोडिज’ फेम रघुरामला मिळाले नवे प्रेम! सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली!!
ए टीव्हीचा लोकप्रीय शो ‘रोडिज’चा माजी परिक्षक रघुराम अलीकडे भावूक झालेला दिसला होता. होय, रघुराम व त्याची पत्नी सुगंधा २०१६ मध्येच विभक्त झाले होते. पण गत जानेवारीत हे दोघे कायदेशीररित्या विभक्त झालेत. रघुराम याने स्वत: ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. पण ही बातमी शेअर करताना तो बराच भावूक झाला होता. लग्नाच्या काही जुन्या फोटोंचा कोलाज शेअर करत रघुरामने एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. ‘काही गोष्टी कधीच संपणार नाहीत. जसे की, तुझ्या व माझ्या मनातील प्रेम आणि एकत्र असताना आपण करतो ती धम्माल...काहीही संपणार नाही. केवळ बदल होतील आणि आयुष्याचा एक नवा टप्पा सुरु होईल,’ असे रघुरामने लिहिले होते. आता या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे रघुरामच्या आयुष्याचा एक नवा टप्पा सुरु झाला आहे. होय, रघुरामला त्याचे नवे प्रेम मिळालेय. सोशल मीडियावर रघुरामने या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. आता हे नवे प्रेम कोण तर, सिंगर नेटली दि लुकसिओ (Natalie Di Luccio). (हे नाव तुम्ही याआधीही ऐकले असण्याची शक्यता आहे. होय, टीव्ही अभिनेता एजाज खानसोबत कधीकाळी रिलेशनशिपमध्ये असलेली तीच ती नेटली.)
![]()
२०१६ मध्ये नेटली आणि रघु ‘आंखो ही आंखो में’ या गाण्यानिमित्त एकत्र आलेत आणि पुढे एकमेकांत गुंतले. पुढे रघुने पत्नी सुगंधासोबत घटस्फोट घेतला आणि आता रघुने नेटलीसोबतचे नाते जगजाहिर केले आहे. ‘काही वर्षाआधी आजच्याच दिवशी तू माझ्या आयुष्यात आली आणि माझा मी मला परत मिळालो. तुझ्यासोबत मी प्रेम अनुभवले, आनंद अनुभवला. तू माझ्या आयुष्यात आशा बनून आलीस. आय लव्ह यू...,’ अशी एक अतिशय भावूक पोस्ट रघुने लिहिली आहे. सोबत नेटलीसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. नेटलीने ‘इंग्लिश विंग्लिश’,‘चेन्नई एक्सप्रेस’,‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ अशा अनेक चित्रपटांत गाणी गायली आहेत.
ALSO READ : ‘रोडिज्’ फेम रघुरामचा पत्नी सुगंधासोबत घटस्फोट; लिहिली इमोशनल पोस्ट