लग्नात छत्री घेऊन परीसोबत राघव चड्डाही थिरकले, न्यूली मॅरिड कपलचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 08:59 IST2023-09-26T08:58:17+5:302023-09-26T08:59:03+5:30

रागनीति! न्यूली मॅरिड कपलचा Video पाहिलात का

Raghav Chadha also danced with Parineeti with an umbrella in the wedding the video of the newly married couple went viral. | लग्नात छत्री घेऊन परीसोबत राघव चड्डाही थिरकले, न्यूली मॅरिड कपलचा Video व्हायरल

लग्नात छत्री घेऊन परीसोबत राघव चड्डाही थिरकले, न्यूली मॅरिड कपलचा Video व्हायरल

आम आदमी पार्टीचे नेता राघव चड्डा (Raghav Chadha)आणि बॉलिवूडची 'परी' परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. या गोड कपलचे लग्नातील फोटो कालच समोर आले. तर आता हळूहळू लग्नातील काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. २४ सप्टेंबरला उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये शाहू विवाहसोहळा पार पडला. या न्यूली मॅरिड कपलचा एक व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय. यामध्ये दोघंही डान्स करत एंट्री घेताना दिसत आहेत. 

फुलांनी सजलेला परिसर, आकर्षक सजावट आणि सुरेल माहोलमध्ये परिणीती आणि राघव यांची एन्ट्री होते. बेबी पिंक रंगाची छत्री घेऊन कपल चालत येतात. तसंच गाण्यावर थिकरतानाही दिसतात. चुलबुली परीसोबत 'आप'चे नेता राघव चड्डाही थिकरताना दिसत आहेत. राघव चड्डांचा हा अंदाज याआधी कधीच पाहिला नसेल. दोघंही खूप खूश दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
 

९० च्या दशकाची थीम बेस्ड प्रीवेडिंग पार्टी आणि जयमाला, फेरे, विदाई  हे सर्व झाल्यानंतर दोघांनी रात्री रिसेप्शन दिलं. त्यांच्या रिसेप्शनचा लुकही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कालच हे कपल दिल्लीमध्ये पोहोचलं असून राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. तर नंतर मुंबईतही बॉलिवूड कलाकारांसाठी रिसेप्शन होणार आहे. 

Web Title: Raghav Chadha also danced with Parineeti with an umbrella in the wedding the video of the newly married couple went viral.