​राधिकाची शॉर्टफिल्म ‘क्रिती’ युट्यूबवरुन हटविली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 15:53 IST2016-06-29T10:23:57+5:302016-06-29T15:53:57+5:30

गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालणारी राधिका आपटे आणि मनोज वाजपेयी यांची ‘क्रिती’ ही शॉर्टफिल्म नुकतीच ...

Radhika's short film 'Creedy' was deleted from YouTube. | ​राधिकाची शॉर्टफिल्म ‘क्रिती’ युट्यूबवरुन हटविली.

​राधिकाची शॉर्टफिल्म ‘क्रिती’ युट्यूबवरुन हटविली.

ल्या आठवड्यात सोशल मीडियावर आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालणारी राधिका आपटे आणि मनोज वाजपेयी यांची ‘क्रिती’ ही शॉर्टफिल्म नुकतीच युट्यूबवरुन हटविण्यात आली. या शॉर्टचे दिग्दर्शन शिरीष कुंदरने केले होते. मात्र ही फिल्म नेपाळी शॉर्ट फिल्ममधून कॉपी के ल्याचा आरोप नेपाळी दिग्दर्शक अनिल नेउपा यांच्याकडून करण्यात आला आहे. आणि या वादामुळेच ही शॉर्टफिल्म आता यू ट्यूबवरुन हटवण्यात आली आहे. ह्यक्रितीह्णमध्ये राधिका आपटे, मनोज वाजपेयी आणि नेहा शर्मा यांची मुख्य भूमिका आहे. अनिल नेउपाने यांच्या कॉपीराईटच्या दाव्यानंतर ही शॉर्ट फिल्म आता यू ट्यूबवर उपलब्ध नाही.
अनिल नेउपाने यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती की, ‘क्रितीची कहाणी माझी शॉर्ट फिल्म ‘बॉब’मधून चोरली आहे. मी २०१५ मध्ये ही शॉर्ट फिल्म बनवली होती.

Web Title: Radhika's short film 'Creedy' was deleted from YouTube.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.