अभिनेत्रीचा असा अवतार पाहून चाहतेही झाले चकीत, ओळखणेही झाले कठिण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 20:03 IST2021-04-12T19:57:29+5:302021-04-12T20:03:34+5:30
Radhika Apte Without Makeup Look: चित्रपट असोत, वा वेब सीरिज राधिका आपटेचं नाव आघाडीवर घेतलं जातं. तिच्या दमदार अभिनयामुळे देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

अभिनेत्रीचा असा अवतार पाहून चाहतेही झाले चकीत, ओळखणेही झाले कठिण
अभिनेत्रींचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. त्यांचा स्टायलिश अंदाज पाहून चाहते घायाळ होतात.कधी कधी अभिनेत्रींचा असाही अंदाज समोर येतो की, चाहते त्यांचे असे फोटो पाहून थक्क होतात. सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा असा फोटो समोर आला आहे. ज्याला पाहून अनेकांनी तर तिला ओळखलेच नाही, तर काहींनी ओळखले असले तरी तिची अशी अवस्था पाहून नेमके हिला झाले तरी काय असा प्रश्नच त्यांना सतावत आहे. व्हायरल होणारा फोटोत दिसणारी अभिनेत्री आहे राधिका आपटे. तिचा हा अवतार पाहून अनेकांनी विचित्र कमेंट्स केल्याचेही पाहायला मिळत आहे. व्हायरल होणारा राधिकाचा फोटो जुना फोटो आहे. पुन्हा तोच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चित्रपट असोत, वा वेब सीरिज राधिका आपटेचं नाव आघाडीवर घेतलं जातं. तिच्या दमदार अभिनयामुळे देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. रील लाइफमध्ये जशी राधिका बोल्ड दिसते तशीच रिअल लाइफमध्येही ती बिनधास्त आहे. हेच या फोटोवरुनही स्पष्ट होते. राधिकाचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर पाहायला मिळतो. इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो चाहत्यांच्या नेहमी पसंतीस उतरत असतात.
राधिका सोशल मीडियावर सक्रीय असते आणि ती तिचे फोटो व आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा ग्लॅमरस व हॉट अंदाजात दिसणाऱ्या राधिकाला नो मेकअप लूकमध्ये पाहून चाहते चकीत झाले आहेत. या फोटोत ती फारच वेगळी दिसते आहे. त्यात तिचे केसही विस्कटलेले दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.
राधिका तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामध्ये ताळमेळ घालण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तिचे लग्न झाले असून तिचा नवरा परदेशात असतो. राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ सिनेमातही काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.