राधिका आपटे करणार अवयवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 07:15 IST2018-08-10T15:17:47+5:302018-08-11T07:15:00+5:30

राधिका आपटेने सोशल मीडियावर अवयवदान करणार असल्याचे सांगितले आहे. 

Radhika Apte will donate her organ | राधिका आपटे करणार अवयवदान

राधिका आपटे करणार अवयवदान

ठळक मुद्देराधिकाने चाहत्यांनाही अवयवदान करण्याचे केले आवाहन

हल्ली काही कलाकार आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत सामाजिक सेवा करताना दिसतात. मग ती कुठल्याही प्रकारची समाजसेवा असो ते आपापल्या परीने करीत असतात. अक्षय कुमार, सलमान खान, शाहरूख खान, सुश्मिता सेन, रविना टंडन, जुई चावला अशा काही सेलेब्स या यादीत समावेश आहे. या कलाकारांसोबत आता आणखीन एका कलाकाराने समाजसेवेमध्ये पुढाकार घेतला आहे. या कलाकाराचे नाव आहे अभिनेत्री राधिका आपटे. राधिकाने सोशल मीडियावर अवयवदान करणार असल्याचे सांगितले आहे. 


अभिनेत्री राधिका आपटेने मराठी व हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.तसेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये ती प्रमुख भूमिकेत असून यातील तिच्या कामाचे कौतूक होत आहे. आता राधिका समाजकार्यासाठी पुढे सरसावली आहे. तिने ‘ऑर्गन डोनेशन’ अर्थात अवयवदान करणार असल्याचे सांगितले आहे. राधिकाने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरुन एका व्हिडिओद्वारे याबाबत घोषणा केली आहे.



 

अवयवदानासाठी नाव नोंदणी केल्यानंतर राधिकाला देण्यात आलेल्या, ‘ऑर्गन डोनर कार्ड’ चा फोटोही तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
इतकेच नाही तर राधिकाने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांनाही अवयवदान करण्यासाठी आवाहन केले आहे.



 

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून मी हा अवयवदानाचा निर्णय घेतला असल्याचे राधिका सांगते. दरम्यान राधिका आपटेने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांनाही अवयवदान करण्याचे आवाहन केले आहे. ‘देशातील जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करुन गरजू लोकांचे भले करावे’, अशाप्रकारचा एक संदेश राधिकाने तिच्या व्हिडीओमधून दिला आहे. खरेच राधिकाने उचलले हे पाऊल कौतूकास्पद आहे. 

Web Title: Radhika Apte will donate her organ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.