Radhika Apte Wedding: लग्नाच्या दिवशीच राधिका आपटेनं दारुच्या नशेत केली मोठी चूक; अनेक वर्षांनंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 02:12 PM2023-01-14T14:12:47+5:302023-01-14T14:13:38+5:30

Radhika Apte Wedding: राधिका आपटेचं नाव बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. राधिका नेहमी वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि वेब सीरिज करण्यासाठी ओळखली जाते.

Radhika Apte Wedding: Radhika Apte did not take her marriage photos in drunkenness; Revealed after many years | Radhika Apte Wedding: लग्नाच्या दिवशीच राधिका आपटेनं दारुच्या नशेत केली मोठी चूक; अनेक वर्षांनंतर केला खुलासा

Radhika Apte Wedding: लग्नाच्या दिवशीच राधिका आपटेनं दारुच्या नशेत केली मोठी चूक; अनेक वर्षांनंतर केला खुलासा

googlenewsNext

Radhika Apte Wedding:राधिका आपटे (Radhika Apte)चं नाव बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. राधिका नेहमी वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि वेब सीरिज करण्यासाठी ओळखली जाते. राधिकाचे जवळपास सर्वच चित्रपट बघण्यासारखे आहेत. राधिकाला ओटीटी प्लॅटफॉर्मची राणी देखील म्हटलं जातं. राधिका पडद्यावर जितकी बोल्ड दिसते तितकीच ती खऱ्या आयुष्यातही बोल्ड आहे. आज आम्ही राधिकाच्या लग्नाशी संबंधित एक अतिशय रंजक गोष्ट सांगणार आहोत.

ब्रिटिश व्यक्तीशी लग्न केलं
राधिकानं 2012 मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. लग्नाच्या वर्षभरानंतर त्यांनी आपल्या लग्नाचा खुलासा केला होता. राधिकानं 2012 मध्ये लाइमलाइटपासून दूर काही निवडक लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं आणि 2013 मध्ये अधिकृतपणे लग्नाचा खुलासा केला. राधिकानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिच्याकडे तिच्या लग्नाचा एकही फोटो नाही.

फोटो काढायला सगळेच विसरले
इंडिया युडेशी केलेल्या खास संवादात राधिकानं सांगितलं की, 10 वर्षांपूर्वी बेनेडिक्ट आणि तिचं लग्न झालं. पण, लग्नाचे फोटो काढायला सर्वजण विसरले. त्यांच DIY लग्न झालं होतं, म्हणजेच फक्त मित्रांच्या उपस्थितीत घरच्या घरी लग्न केलं. इंग्लंडमध्ये लग्न आणि त्यानंतर लगेच लग्नाची पार्टी झाली. यावेळी सर्वजण फोटो काढायला विसरेल. याचं कारणही रंजक आहे. लग्नाच्या दिवशी लग्नात आलेले सर्वजण नशेत होते, त्यामुळे त्यांना फोटो काढण्याचं लक्षात आलं नाही.

Web Title: Radhika Apte Wedding: Radhika Apte did not take her marriage photos in drunkenness; Revealed after many years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.