राधिका आपटे बऱ्याचदा करते लंडनवारी... हे आहे या मागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 19:20 IST2019-02-09T19:20:00+5:302019-02-09T19:20:00+5:30
अभिनेत्री राधिका आपटे शूटिंगमध्ये व्यस्त नसते. त्यावेळी ती बऱ्याचदा लंडनला जाते.

राधिका आपटे बऱ्याचदा करते लंडनवारी... हे आहे या मागचं कारण
अभिनेत्री राधिका आपटे शूटिंगमध्ये व्यस्त नसते. त्यावेळी ती बऱ्याचदा लंडनला जाते. ती सारखी लंडनला का जाते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना... राधिकाचा नवरा बेनेडिक्ट टेलर लंडनमध्ये राहतो. तो एक संगीतकार आहे. राधिका व टेलरने २०१२ साली लग्न केले. राधिकाने एका मुलाखतीत रिलेशनशीपबद्दल सांगितले होते की, एक लाँग डिस्टेन्स रिलेशनशीपमध्ये राहणे सोप्पी गोष्ट नाही. मात्र राधिका दरमहिन्यात आपल्या जीवनसाथीला वेळ द्यायला विसरत नाही.
राधिकाने सांगितले की, टेलर भारतात येतो किंवा मी लंडनमध्ये जाते. रिलेशनशीपमध्ये तुम्ही कशापद्धतीने नेहमी भेटतात, हे महत्त्वाचे आहे. आम्ही महिन्यातील काही दिवस एकत्र व्यतित करतो. बऱ्याचदा आम्ही यासाठी महत्त्वाचे प्लान्सदेखील रद्द करतो. जर मनापासून एकत्र राहायचे असेल तर तुम्ही एकमेकांना वेळ देण्यासाठी प्रयत्न करता. ती व्यक्ती तुमच्यासाठी पहिले प्राधान्य ठरते.
तिने पुढे सांगितले की, लाँग डिस्टेन्स रिलेशनशीपमध्ये इतका काळ राहिल्यानंतर मी सांगेन लाँग डिस्टेन्स रिलेशनशीपमध्ये राहणे खूप कठीण आहे. बऱ्याचदा लोक मला विचारतात की तुला एकटीला कंटाळा येत नाही का? पण, कित्येक लोक सर्वांसोबत घरात राहूनही त्यांना एकटेपणा वाटत असतो. जर घरी पोहचल्यावर तुम्ही एकटे असाल तर जरा कंटाळा येतो पण नंतर सवय होऊन जाते.
राधिका म्हणाली, जेव्हा टेलरने मला डेट करायला सुरूवात केली होती. त्यावेळी त्याने आपली नोकरी सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आम्हा दोघांना हे योग्य वाटले नाही. आम्ही दोघे आमच्या करियरकडे गांभीर्याने पाहतो. त्यामुळे काम सोडून आम्ही दोघेही खूश राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघेही कामांना प्राधान्य देतो व एकमेकांना नेहमी प्रोत्साहन देतो.