'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'चं नवं गाणं 'सिटी मार' रिलीज, मिळतोय चांगला रिस्पॉन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 13:24 IST2021-04-26T13:23:38+5:302021-04-26T13:24:21+5:30

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच 'सिटी मार' हे गाणे खूप चर्चेत आहे.

Radhe: Your Most Wanted Brother's new song 'City Mar' released, getting good response | 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'चं नवं गाणं 'सिटी मार' रिलीज, मिळतोय चांगला रिस्पॉन्स

'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'चं नवं गाणं 'सिटी मार' रिलीज, मिळतोय चांगला रिस्पॉन्स

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच 'सिटी मार' हे गाणे खूप चर्चेत असून सोशल मीडियावर हा ट्रॅक चर्चेचा विषय बनला आहे. या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर गायले असून शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे ज्यांनी या आधी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ तयार केला होता. 

सलमान खानची सिग्नेचर डांस स्टाइलसोबत, तरुणाईची सध्याची आवडती हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पटानीसोबतची त्याची जोडी, शेख जानी बाशा ज्यांना जानी मास्टर नावाने ओळखले जाते त्यांची कोरियोग्राफी आणि प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार, ‘सिटी मार’मध्ये  प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावत आहे. जानी मास्टर आणि प्रभुदेवाने हिप-हॉपसोबत क्लासिक साउथ स्टाइल कोरियोग्राफीचे उत्तम मिश्रण सादर केले आहे. सोबतच, सलमान आणि दिशा दोघांनीही आपल्या सेंसेशनल केमिस्ट्री आणि उमद्या डांस मूव्स सर्व कसोट्यांना खऱ्या उतरल्या आहेत ज्या बघताना तुम्हीदेखील त्यावर ठेका धरण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत.

‘सिटी मार’ची हुक स्टेप सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी पुरेशी आहे, आणि सलमान खानच्या या हुक स्टेपसोबत, ती प्रचंड वायरलदेखील होते आहे. ट्रेलर आणि गाणे पाहिल्यानंतर, या वर्षी ईदला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे. 


सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे.

सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर 'पे-पर-व्यू' सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल. झी प्लेक्स डीटीएच प्लेटफॉर्म जसे की डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल टीवी वर देखील उपलब्ध असेल.

Web Title: Radhe: Your Most Wanted Brother's new song 'City Mar' released, getting good response