जे बात!! प्रभासच्या ‘राधे श्याम’ला मागे टाकत ‘द काश्मीर फाईल्स’ने कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 03:49 PM2022-03-13T15:49:38+5:302022-03-13T15:50:49+5:30

The Kashmir Files Second Day Box Office Collection : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी बक्कळ कमाई केली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी तब्बल 139% वाढ झाली.

Radhe Shyam And The Kashmir Files Second Day Box Office Collection | जे बात!! प्रभासच्या ‘राधे श्याम’ला मागे टाकत ‘द काश्मीर फाईल्स’ने कमावले इतके कोटी

जे बात!! प्रभासच्या ‘राधे श्याम’ला मागे टाकत ‘द काश्मीर फाईल्स’ने कमावले इतके कोटी

googlenewsNext

The Kashmir Files Second Day Box Office Collection : बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’  (The Kashmir Files) हा चित्रपट गेल्या शुक्रवारी (11 मार्च) प्रदर्शित झाला आणि सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा सुरू झाली. 1990 साली नरसंहारात बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडणाऱ्या या चित्रपटाची  सोशल मीडियावर चर्चा होतीच. आता  बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा धुमाकूळ घालतो आहे. अगदी या चित्रपटाने साऊथ सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ (हिंदी) या चित्रपटालाही मागे टाकले आहे.

शुक्रवारी पहिल्याच दिवशी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती.  पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 3.55 कोटींची कमाई केली. पण काल दुसऱ्या दिवशी माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर अशी काही मुसंडी मारली की, चित्रपटाच्या कमाईत तब्बल 139 टक्के वाढ झाली. काल शनिवारी ‘द काश्मीर फाईल्स’ने 8.50 कोटींचा गल्ला जमवला. म्हणजेच, दोनच दिवसांत या चित्रपटाने 12.05 कोटींची कमाई केली.
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी साधारण 12 कोटींचा खर्च आला तर प्रिंटिंग आणि जाहिरातींसाठी 2 कोटींचा खर्च करण्यात आला होता. दोनव दिवसांत हा खर्च जवळपास वसूल झाला आहे. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट  बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार अशी आशा आहे. 

राधे श्याम पडला मागे...
‘द काश्मीर फाईल्स’ने दोन दिवसांत 12.05 कोटींची कमाई केली. याऊलट ‘राधेश्याम’च्या हिंदी व्हर्जनने केवळ 9 कोटींचा पल्ला गाठला. पहिल्या दिवशी ‘राधेश्याम’ने (Radhe Shyam ) 4.5 कोटींचा बिझनेस केला. दोन दिवसांत या चित्रपटाने एकूण 9 कोटी (यात राधेश्यामच्या साऊथ व वर्ल्ड वाईड कलेक्शनचे आकडे समाविष्ट नाहीत) कमावले.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच प्रकाश बेलवाडी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, भाषा सुंबळी, पुनीत इस्सार,  अतुल श्रीवास्तव, पृथ्वी सरनाविक यांसारख्या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.  या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णी या मराठी कलाकारांना महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांचा देखील या चित्रपटाला पुरेसा प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Radhe Shyam And The Kashmir Files Second Day Box Office Collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.