सलमान खानच्या शब्दाखातर साईन केला सिनेमा, मग सेटवर झाली दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 15:38 IST2020-03-13T15:32:27+5:302020-03-13T15:38:27+5:30
सलमानने सांगितले म्हणून मी हा सिनेमा करण्यास तयार झालो.

सलमान खानच्या शब्दाखातर साईन केला सिनेमा, मग सेटवर झाली दुखापत
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा दबंग सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी काही आपली कमाल दाखवू शकला नाही. सलमान खान आता फॅन्ससाठी एक नवा सिनेमा घेऊन येतो आहे. ज्यात सलमान जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'राधे'. यात निगेटिव्ह भूमिका साकारणार आहे रणदीप हुड्डा.
आजतकच्या रिपोर्टनुसार, रणदीप हुड्डा म्हणाला सिनेमात एक सीन असा आहे ज्यात सलमान खान माझ्या पाठीवरुन उडी मारतो. हा सीन शूट करताना तब्बल 18 रिटेक घेतल्याचे त्यामुळे माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. निगेटिव्ह भूमिका करण्यास नकार दिल्यानंतर सलमानच्या म्हणण्यावर मी हा सिनेमा करण्यास तयार झालो. सलमान खानशी असणाऱ्या बॉडिंगबद्दल तो म्हणाला, एक माणूस, एक अभिनेता म्हणून मी त्याची खूप आदर करतो.
राधेमध्ये सलमान नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान खान आणि प्रभूदेवा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे.तर भारत सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसलेली दिशा पटानी या चित्रपटात सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. 'राधे' चित्रपट २०२०मध्ये ईदच्या वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.