ए. आर. रहमानने केले धक्कादायक वक्तव्य; म्हटले, ‘हा माझा भारत नाही’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:26 IST2017-09-08T11:56:00+5:302017-09-08T17:26:00+5:30

पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरात निषेध केला जात असून, सेलिब्रिटींचाही यानिमित्त व्यवस्थेविरोधात आक्रमक पवित्रा बघावयास ...

A. R. Rahman made a shocking statement; Said, 'This is not my India'! | ए. आर. रहमानने केले धक्कादायक वक्तव्य; म्हटले, ‘हा माझा भारत नाही’!

ए. आर. रहमानने केले धक्कादायक वक्तव्य; म्हटले, ‘हा माझा भारत नाही’!

्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरात निषेध केला जात असून, सेलिब्रिटींचाही यानिमित्त व्यवस्थेविरोधात आक्रमक पवित्रा बघावयास मिळत आहे. कालच अभिनेता कमल हासन याने कठोर शब्दात आपले मत मांडल्यानंतर प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी याप्रकरणी अतिशय धक्कादायक असे वक्तव्य केले आहे. ‘मां तुझे सलाम’ आणि ‘वंदेमातरम’ यांसारख्या गाण्यांना आपल्या समधुर आवाजाने भारतीयांमध्ये स्फुरण निर्माण करणाºया रहमान यांनी चक्क ‘हा माझा भारत नाही’ असे वक्तव्य करून नव्या चर्चेला एकप्रकारे निमंत्रण दिले आहे. 

पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची दिवसाढवळ्या हत्या केल्याने देशभरात त्याचा निषेध नोंदविला जात आहे. ए. आर. रहमान यांनीही याप्रकरणी निषेध नोंदविताना म्हटले की, ‘जर गौरी लंकेश यांच्यासारख्या वैचारिक व्यक्तींच्या हत्या होत असतील, तर हा माझा भारत नाही.’ रहमान यांनी गेल्या गुरुवारी मुंबई येथे त्यांच्या आगामी ‘वन हार्ट : द ए. आर. रहमान कॉन्सर्ट’ चित्रपटाच्या प्रीमियरप्रसंगी हे वक्तव्य केले. 



बेंगळुरू येथे त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकºयांनी गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. जेव्हा याविषयी रहमान यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, ‘जेव्हा मला ही घटना कळाली तेव्हा मी खूपच दु:खी झालो, मी अपेक्षा करतो की, भारतासारख्या देशांमध्ये अशा घटना होऊ नयेत. जर भारतात अशा घटना घडतच गेल्या तर तो माझा भारत नाही. मला असे वाटते की, माझा भारत प्रगतिशील आणि विनम्र असावा.’ रहमान यांच्या या वक्तव्यानंतर नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

‘वन हार्ट...’ हा चित्रपट रहमान यांच्या उत्तर अमेरिकेतील १४ शहरांमध्ये झालेल्या कॉन्सर्ट टूरवर आधारित आहे. यामध्ये रहमान आणि त्यांच्या बॅण्डमधील सदस्यांच्या मुलाखती आणि रिहर्सल प्रसंगांच्या क्षणांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर चित्रपटातून रहमानच्या खासगी आयुष्याविषयीही माहिती मिळणार आहे. याविषयी बोलताना रहमानने म्हटले की, ‘वन हार्ट...’ भारतातील कॉन्सर्टवर आधारित कदाचित पहिलाच चित्रपट असेल. आम्ही प्रेक्षकांना एक वेगळा प्रकारचा चित्रपट देऊ इच्छितो. प्रेक्षकांनी अ‍ॅक्शन, रोमान्स, कॉमेडी असलेले बरेचसे चित्रपट बघितले, परंतु गुणवत्ता आणि साउंड म्युझिकल चित्रपट बघितले नाहीत.’

Web Title: A. R. Rahman made a shocking statement; Said, 'This is not my India'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.