​आर. माधवनने पुण्यात साजरा केला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 16:19 IST2016-06-01T10:49:07+5:302016-06-01T16:19:07+5:30

अभिनेता आर. माधवन आज(१ जून)आणखी एका वर्षांनी मोठा झाला. पुण्यात  मित्रांसोबत माधवनने त्याचा वाढदिवस साजरा केला. माधवनच्या जवळच्या मित्रांनी ...

R. Madhavan celebrates birthday in Pune | ​आर. माधवनने पुण्यात साजरा केला वाढदिवस

​आर. माधवनने पुण्यात साजरा केला वाढदिवस

िनेता आर. माधवन आज(१ जून)आणखी एका वर्षांनी मोठा झाला. पुण्यात  मित्रांसोबत माधवनने त्याचा वाढदिवस साजरा केला. माधवनच्या जवळच्या मित्रांनी हा प्लॅन केला आणि त्यानुसार सगळ्यांनी धम्माल मज्जा केली. माधवनच्या बेस्ट फे्रन्डचा एक ग्रूपही या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी पुण्यात पोहोचला. मग काय, देशातील सर्वांत जुन्या गोल्फ मैदानावर सर्व मित्रांनी गोल्फ खेळला. माधवनचे गोल्फ प्रेम सगळ्यांनाच ठाऊक असल्याने यापेक्षा मोठे सरप्राईज असूच शकणार नव्हते. त्यामुळेच ९६ एकरावर पसरलेल्या या गोल्फ मैदानावर माधवन व त्याच्या मित्रांनी मस्तपैकी गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला. यानंतर झाली पार्टी. माधवनची पत्नी सरिता आणि मुलगा हेही या पार्टीला हजर होते. मित्रांचा बर्थ डे सेलिब्रेशन प्लॉन पाहून माधवन अगदी भारावून गेला. माझ्या जवळच्या मित्रांचे सरप्राईज मला जाम आवडले. माझे आवडीचे खाद्य पदार्थ, माझा आवडता खेळ, माझे कुटुंब व माझ्या मित्रांसोबत बर्थ डे सेलिब्रेशन करण्याचा आनंद काही वेगळाच होता, असे तो म्हणाला.

Web Title: R. Madhavan celebrates birthday in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.