R Madhavan New Home: आर माधवनने मुंबईत घेतलं आलिशान घर; आता BKC मध्ये राहणार! किंमत किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 17:51 IST2024-07-25T17:41:39+5:302024-07-25T17:51:14+5:30
R Madhavan New Home: आर माधवनच्या आलिशान फ्लॅटची किंमत किती माहितीये का?

R Madhavan New Home: आर माधवनने मुंबईत घेतलं आलिशान घर; आता BKC मध्ये राहणार! किंमत किती?
'रहना है तेरे दिल मे' मधला मॅडी म्हणजेच सगळ्यांचा आवडता अभिनेता आर माधवन (R Madhavan) त्याच्या विविधांगी भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याचे आज लाखो चाहते आहेत. साऊथसोबतच तो आता बॉलिवूडमध्येही स्थिरावला आहे. अभिनेत्याने नुकताच मुंबईत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. तेही कुठे तर मुंबईतील पॉश समजल्या जाणाऱ्या बीकेसी म्हणजेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (BKC). माधवनच्या या आलिशान फ्लॅटची किंमत ऐकून तुम्हीही थक्क
व्हाल.
'हिंदुस्तान टाईम्स'रिपोर्टनुसार, आर माधवनने मुंबईतील बीकेसी परिसरात फ्लॅट खरेदी केला आहे. फ्लॅटचा एरिया 389 चौरस मीटर आहे. बीकेसीतील Signia Pearl या इमारतीत 4 आणि 5 बीएचके फ्लॅट आहे. यामध्येच माधवनने एस फ्लॅट खरेदी केला आहे. या इमारतीतील फ्लॅटमधील इंटेरियर खूप आकर्षक आणि युनिक आहेत. २२ जुलै रोजी माधवनने ही डील फायनल करत तब्बल १.०५ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली. तर रजिस्ट्रेशन फी ३० हजार रुपये होती. माधवनने घेतलेल्या या फ्लॅटची किंमत तब्बल 17.5 कोटी आहे.
बीकेसी हा मुंबईतला सर्वात पॉश आणि प्रतिष्ठित भाग आहे. अनेक उच्चभ्रू लोक याच ठिकाणी राहतात. अंबानींचं प्रसिद्ध जिओ वर्ल्ड सेंटरही इथेच आहे. शिवाय अनेक बँका, कंपन्यांचं हेड ऑफिस याठिकाणी आहे. उच्च दर्जाच्या सोयी सुविधा, लक्झरिअस लाईफस्टाईल इथे पाहायला मिळते. मुंबईतलं हे लोकप्रिय आणि मध्यवर्ती ठिकाण आहे.
वर्कफ्रंट
आर माधवनचा 'शैतान' काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. सिनेमाने बक्कळ कमाई केली. लवकरच तो एस शशिकांत यांच्या 'द टेस्ट' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये सिद्धार्थ आणि नयनताराची भूमिका आहे.