जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू हे बॉलिवूडमधील एकेकाळचे हॉट कपल.पण अचानक दोघांमध्ये ब्रेकअप झाले आणि नंतर सगळेचं बिनसले. आता तर जॉन व बिपाशा एकमेकांचे नावही ऐकण्यास तयार नाहीत.
बिपाशाबद्दल प्रश्न विचारला अन् जॉन भडकला
/>जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू हे बॉलिवूडमधील एकेकाळचे हॉट कपल. या दोघांमधील खुल्लमखुल्ला प्रेम, लिव्ह इन रिलेशनशिप सगळचं चर्चेचा विषय ठरलं होतं. पण अचानक दोघांमध्ये ब्रेकअप झालं आणि नंतर सगळेचं बिनसलं. आता तर जॉन व बिपाशा एकमेकांचे नावही ऐकण्यास तयार नाहीत. बिपाशा येत्या ३० एप्रिलला करणसिंग ग्रोव्हरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईतील एका कार्यक्रमात जॉनला प्रश्न विचारण्यात आला. बिपाशाबद्दलचा प्रश्न विचारताच जॉनचा पारा एकदम चढला आणि समोरील माईक बाजूला सारून तो कार्यक्रमातून चालता झाला. याचा अर्थ एकच आता जॉनला बिपाशाचे नावही नकोय. मग तिच्या भावी आयुष्याला शुभेच्छा वगैर देणे तर दूरच...तिकडे बिपाशानेही लग्नासाठीच्या निमंत्रितांच्या यादीतून जॉनचे नाव कट केलेयं..आता काय म्हणावे, शेवटी दिसते ते पहावं...नाही का?
Web Title: Question about Bipasha and John Bhadkala