राणी पतरणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 17:43 IST2016-10-05T12:13:32+5:302016-10-05T17:43:32+5:30
अनेक बॉलिवूड प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, राणी लवकरच रूपेरी ...

राणी पतरणार!
अ ेक बॉलिवूड प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, राणी लवकरच रूपेरी पडद्यावर वापसी करतेय. दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा यांच्या चित्रपटातून राणी पुनर्पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. सध्या राणी मुलगी आदिरा हिच्या संगोपनात व्यस्त आहे. येत्या डिसेंबरमध्ये आदिरा एक वर्षाची होतेय. त्यामुळे राणी आपला काही वेळ चित्रपटांसाठी देऊ शकते. त्यामुळेच तिने हा चित्रपट साईन केला. सामाजिक विषयाला वाहिलेल्या या चित्रपटात राणी लीड रोलमध्ये दिसणार आहे. २०१४ मध्ये राणी ‘मर्दानी’मध्ये अखेरची दिसली होती. यात तिने पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारली होती. त्यांनतर आदिराचा जन्म आणि संगोपनात राणी व्यस्त झाली. आता ती पुन्हा रूपेरी पडद्यावर झळकणार म्हटल्यावर चाहत्यांचा आनंदच होणार!