राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा यांना गतवर्षी ९ डिसेंबरला गोड कन्यारत्नाचा लाभ झाला. अदिरा तिचे नाव!! अदिराच्या जन्माने राणी ...
राणी-आदित्यची Baby Announcement
/>राणी मुखर्जी आणि आदित्य चोपडा यांना गतवर्षी ९ डिसेंबरला गोड कन्यारत्नाचा लाभ झाला. अदिरा तिचे नाव!! अदिराच्या जन्माने राणी आणि आदित्य दोघेही आनंदाने न्हावून निघाले आहेत. चिमुकल्या अदिराच्या स्वागतासाठी राणी व आदित्यने काहीही कसर सोडलेली नाही...आणि आता अदिराच्या गोड मम्मीपप्पांनी आपल्या सर्व मित्रांना एक गोड भेट पाठवून अदिराच्या जन्माचा आनंद साजरा केला आहे. यामाध्यमातून राणी व आदित्यने आपल्या गोड मुलीच्या जन्माची बातमी सर्वांना दिली. तिचे नाव, तिच्या जन्माची तारीख आणि सोबत काही गोड भेट अशा रूपात राणी व आदित्यने अदिराच्या आपल्या बेबीच्या जन्माची बातमी जाहिर केली.