मंदिरा बेदीने चक्क साडीवर मारल्या पुशअप्स, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 19:27 IST2018-02-09T13:57:11+5:302018-02-09T19:27:18+5:30

मंदिरा बेदी तिच्या सोशल अकाउंटवरून नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ती चक्क साडीवर पुशअप्स मारताना दिसत आहे.

Pushups on Mandira Bedi sacked, see video! | मंदिरा बेदीने चक्क साडीवर मारल्या पुशअप्स, पाहा व्हिडीओ!

मंदिरा बेदीने चक्क साडीवर मारल्या पुशअप्स, पाहा व्हिडीओ!

िनेत्री मंदिरा बेदी सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव असते. दिवसाआड एकतरी फोटो ती तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करीत असते. त्यातही मंदिरा एक्सरसाइज करतानाचे फोटो सर्वाधिक अपलोड करीत असते. इंडस्ट्रीमध्ये मंदिराचे स्टाइल स्टेटमेंट सर्वात वेगळे आणि हटके आहे. त्यामुळे मंदिरा ज्याठिकाणी जाते त्याठिकाणी तिचा अंदाज बघण्यासारखा असतो. मंदिरा आपल्या लाइफमध्ये फिटनेसला खूप महत्त्व देते. त्यामुळेच वयाच्या ४६व्या वर्षीही मंदिरा फिट असल्याचे दिसून येते. नुकतेच मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये ती चक्क साडीमध्ये पुशअप्स मारताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिच्या बाजूला आणखी एक व्यक्ती पुशअप्स मारताना दिसत आहे. 

मंदिराने शाहरूख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटात शांतीची भूमिका साकारली होती. चित्रपटात ती पंजाबमधील एका लाजाळू मुलीची भूमिका साकारताना दिसली. तेव्हापासून आतापर्यंत मंदिराच्या रूपात कुठलाही बदल झाल्याचे जाणवत नाही. नुकतेच मंदिराने तिच्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये मंदिरा व्हाइट शर्टमध्ये दिसत होती. तिचा हा फोटो खूपच हॉट असल्याने यूजर्सनी तिला ट्रोल केले होते. तिच्या या फोटोला खूपच विचित्र कॉमेण्ट्स दिल्या होत्या. 
 

एका यूजर्सनी तर तिला चक्क ‘म्हातारी’ असे म्हटले होते, तर काहींनी तिला ‘जेव्हा मंदिराच्या आयुष्यात काही नवीन घडत नाही तेव्हा ती अशाप्रकारच्या गोष्टी करीत असते’ असे म्हटले होते. वास्तविक मंदिराला पहिल्यांदाच यूजर्सनी ट्रोल केले असे नाही. यापूर्वीदेखील तिला बºयाचदा अशा प्रसंगांचा सामना करावा लागला. परंतु मंदिराचा यावर काहीच परिणाम होताना दिसत नाही. उलट ती नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करीत आली आहे. असो, मंदिराचा हा पुशअप्स मारतानाचा व्हिडीओ मात्र तिच्या चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. 

Web Title: Pushups on Mandira Bedi sacked, see video!