अल्लू अर्जुननं का घेतली संजय लीला भन्साळींची भेट? बॉलिवूडमध्ये करणार का धमाका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 10:43 IST2022-03-16T10:43:03+5:302022-03-16T10:43:45+5:30

Allu Arjun : नुकताच अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ (Pushpa ) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. अशात अल्लू अर्जुन बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शक-निर्मात्यांच्या डोळ्यांत भरणार नसेल तर नवल.

Pushpa' star Allu Arjun spotted at sanjay leela Bhansali's office | अल्लू अर्जुननं का घेतली संजय लीला भन्साळींची भेट? बॉलिवूडमध्ये करणार का धमाका?

अल्लू अर्जुननं का घेतली संजय लीला भन्साळींची भेट? बॉलिवूडमध्ये करणार का धमाका?

बन्नी, आर्या, स्टायलिस्ट सुपरस्टार, सुपर डान्सर, हॅपी अशा बऱ्याच नावांनी ओळखला जाणारा साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन (Allu Arjun). नुकताच त्याचा ‘पुष्पा’ (Pushpa ) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला.  या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनवर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. अशात अल्लू अर्जुन बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शक-निर्मात्यांच्या डोळ्यांत भरणार नसेल तर नवल.

पुष्पा’नंतर अल्लू अर्जुनची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. प्रेक्षक त्याला बॉलिवूड सिनेमांही पाहायला उत्सुक आहेत आणि कदाचित हा योग लवकरच येण्याची शक्यता आहे. होय, अल्लू अर्जुनने नुकतीच बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळींची (Sanjay Leela Bhansali) भेट घेतली. अल्लू भन्साळींच्या ऑफिसत स्पॉट झाला.

सोमवारी अल्लू अर्जुन संजय लीला भन्साळींच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटायला पोहोचला. यावेळी  काळी टी-शर्ट आणि पॅन्ट अशा कॅज्युअल लुकमध्ये तो दिसला. अल्लू दिसताच पापाराझींनी त्याला घेरलं.  अल्लू भन्साळींना भेटायला का पोहोचला? याबद्दल अधिकृत माहिती नाही. पण या भेटीनंतर अल्लू भन्साळींच्या सिनेमात दिसणार, असा कयास बांधला जात आहे.

आत्तापर्यंत अल्लूने बॉलिवूडच्या एकाही सिनेमात काम केलेलं नाही. अलीकडे एका मुलाखतीत अल्लू यावर बोलला होता. आत्तापर्यंत एकही अशी स्क्रिप्ट मिळाली नाही, जी मला बॉलिवूडमध्ये घेऊन येईल, असं तो म्हणाला होता. आता भन्साळींच स्क्रिप्ट अल्लू आवडते की नाही, ते बघूच.

अल्लूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, अल्लू सध्या ‘पुष्पा’चा दुसरा भाग ‘पुष्पा द रूल’ यर सिनेमात बिझी आहे. हा सिनेमा 2022 च्या डिसेंबरमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनचा आयकॉन हा वेणू श्रीराम दिग्दर्शित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे AA21 हा चित्रपट देखील 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Pushpa' star Allu Arjun spotted at sanjay leela Bhansali's office