बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघातात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 14:37 IST2025-10-09T14:36:54+5:302025-10-09T14:37:53+5:30
३५ वर्षीय प्रसिद्ध गायकाच्या निधनाने सिनेइंडस्ट्री हळहळली आहे. बुधवारी(८ ऑक्टोबर) प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता असलेल्या राजवीर जवांदा याचं निधन झालं. त्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघातात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
३५ वर्षीय प्रसिद्ध गायकाच्या निधनाने सिनेइंडस्ट्री हळहळली आहे. बुधवारी(८ ऑक्टोबर) प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता असलेल्या राजवीर जवांदा याचं निधन झालं. त्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजवीरचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. गेल्या ११ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनाने कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
राजवीर काही दिवसांपूर्वी हिमाचलला रोड ट्रिपला गेला होता. त्याची गाडी अचानक समोर आलेल्या भटक्या गायींच्या कळपाला धडकली. या अपघतात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. ११ दिवस त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. अनेक अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
राजवीर रोड ट्रिपवर जाण्याआधी त्याच्या पत्नीने त्याला जाऊ नको, अशी विनवणी केल्याचं त्याच्या मित्राने पंजाबी वृत्तवाहिनीला सांगितलं. "तिने त्याला सांगितलं होतं जाऊ नको. तरीही तो गेला. हाय पॉवर 1300cc बाईक चालवू नको. ती सुरक्षित नाही, असा सल्लाही राजवीरला त्याच्या पत्नीने दिलेला. मी लवकरच सुखरुप परत येईन असं त्याने फोनवर पत्नीला सांगितलं होतं", असं राजवीरच्या मित्राने सांगितलं.
राजवीरच्या मागे त्याची पत्नी आणि दोन छोटी मुलं आहेत. गायकाच्या निधनाने दोन चिमुकल्यांवरचं वडिलांचं छत्र हरपलं आहे. राजवीर जवंदा हा पंजाबी सिनेइंडस्ट्रीतला लोकप्रिय गायक आणि अभिनेता होता. कमी वयात स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्याची 'तू दिस पेंदा', 'खुश रहा कर', 'सरनेम', 'सरदारी' 'अफरीन', 'लँडलॉर्ड', 'डाऊन टू अर्थ' आणि 'कंगनी' ही गाणी लोकप्रिय झाली होती. तसंच त्यानं काही सिनेमात भूमिकाही साकारल्या होत्या.