दिलजीत दोसांजची पत्नी म्हणून चर्चेत असलेली पंजाबी गायिका म्हणाली, "लग्न झालंय पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 12:15 IST2024-03-23T12:14:00+5:302024-03-23T12:15:15+5:30

गायक दिलजीत दोसांजचं लग्न झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अखेर ज्या गायिकेसोबत दिलजीतने लग्न केल्याचा दावा केला जात होता तिने मौन सोडलंय

punjabi singer nisha bano on wedding with singer Diljit Dosanjh | दिलजीत दोसांजची पत्नी म्हणून चर्चेत असलेली पंजाबी गायिका म्हणाली, "लग्न झालंय पण..."

दिलजीत दोसांजची पत्नी म्हणून चर्चेत असलेली पंजाबी गायिका म्हणाली, "लग्न झालंय पण..."

दिलजीत दोसांज गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. दिलजीतने काहीच दिवसांपुर्वी आंतरराष्ट्रीय गायक एड शिरनसोबत खास परफॉर्मन्स केल्याने त्याला चांगलीच वाहवा मिळाली. अशातच दिलजीजबद्दल एक बातमी सध्या चांगलीच चर्चेत आहे ती म्हणजे, त्याने गुपचुप लग्न केलं असून त्याला एक मुलगाही आहे. इतकंच नव्हे दिलजीतचा एका पंजाबी गायिकेसोबतचा लग्नाचा फोटोही व्हायरल झाला. अखेर या व्हायरल फोटोमधील गायिकेनेच याप्रकरणी मौन सोडलंय. 

दिलजीतचा ज्या गायिकेसोबतचा फोटो व्हायरल झाला तिचं नाव निशा बानो. निशा आणि दिलजीतच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाला. याशिवाय या दोघांच्या मुलाचा फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आला. याविषयी निशा म्हणाली, "कोणी मला विचारा सत्य काय आहे ते. ही बातमी इतकी व्हायरल झालीय की लोकं मला विविध फोटो आणि व्हिडीओमध्ये टॅग करत आहेत. माझं लग्न झालंय पण ते समीर माहीसोबत. आणि ही गोष्ट सर्वांना माहित आहे. पण बॉलिवूडवाल्यांना कोण समजावणार?"

अशा शब्दात पंजाबी गायिका निशा बानोने प्रतिक्रिया दिली. दिलजीत आणि निशाचा फोटो लग्नाचा नसून तो एका इव्हेंटमध्ये काढला आहे, असं समजतंय. दिलजीतच्या लग्नाची ही वेगळीच बातमी अभिनेत्री कियारा अडवाणीच्या एका जुन्या मुलाखतीमुळे पसरली. कियाराने तिच्या मुलाखतीत दिलजीतने गुपचुप लग्न केल्याचं गमतीत म्हटलं होतं. यानंतर लोकांनी या प्रकरणाचा तपास करत हा फोटो शोधून काढला. पण या सर्व अफवा असल्याचं आता समोर आलंय.

Web Title: punjabi singer nisha bano on wedding with singer Diljit Dosanjh