बिग बॉस फेम 'या' व्यक्तीने उर्फीला घातली लग्नाची मागणी, अभिनेत्री म्हणाली - 'Love You Too...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 14:50 IST2023-12-15T14:22:13+5:302023-12-15T14:50:53+5:30
'बिग बॉस OTT २' मध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीने उर्फी जावेदला लग्नासाठी प्रपोज केले आहे.

बिग बॉस फेम 'या' व्यक्तीने उर्फीला घातली लग्नाची मागणी, अभिनेत्री म्हणाली - 'Love You Too...'
उर्फी जावेद तिच्या अतरंगी अंदाजासाठी लोकप्रिय आहे, परंतु कधीकधी तिच्या फॅशनमुळे तिला खूप ट्रोलही केलं जातं. पण यामुळे उर्फीला काहीच फरक पडत नाही. ती तरीही हटके फॅशन सतत करत असते. आता उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागे कारणही तसेच आहे. उर्फीला जावेदला एका व्यक्तीने चक्क हात जोडत लग्नाची मागणी घातली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
उर्फीला जावेदला लग्नाची मागणी घालणारा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नसून पुनीत सुपरस्टार आहे. 'बिग बॉस OTT २' मुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. पुनीत सुपरस्टारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो उर्फी जावेदला म्हणतो, 'उर्फी जावेद, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. खूप दिवसांपासून मला एक गोष्ट सांगायची होती. पण कसं सांगावं हे कळत नव्हत. उर्फी मला तुझ्यासारखी मुलगी जोडीदार म्हणून हवी आहे. मी हात जोडून तुला माझ्याशी लग्न करण्याची विनंती करतो'.
विशेष म्हणजे यावर उर्फी जावेदनेही प्रतिक्रिया दिली आहे. पापराझींसोबत बोलताना उर्फी म्हणाली की, 'पुनीतसोबत लग्न करणार नाही. पण त्याला लव्ह यू टू'. उर्फी आणि पुनीतचा हा स्टंट असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. दरम्यान, पुनीत सुपरस्टार 'बिग बॉस OTT २' मधून पहिल्या २४ तासातच घराबाहेर पडला होता. त्याची नॉनस्टॉप बडबड इतकी होती की बिग बॉसने घरातील सदस्यांच्या परस्पर संमतीने पुनीतला शोमधून बाहेर काढले होते.