या अभिनेत्याने सलमान खानसोबत घेतला होता थेट पंगा, ओळखा पाहू कोण आहे हा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 20:00 IST2020-02-23T20:00:00+5:302020-02-23T20:00:01+5:30
हा अभिनेता त्याच्या सिनेमांपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन अधिक चर्चेत असतो.

या अभिनेत्याने सलमान खानसोबत घेतला होता थेट पंगा, ओळखा पाहू कोण आहे हा?
बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
पुलकितने त्याच्या लहानपणीचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच पोस्ट केला असून त्यासोबत मैं बचपन से क्यूट असे कॅप्शन त्याने लिहिले आहे. त्यावर केवळ सामान्य लोकांनीच नव्हे तर इंडस्ट्रीतील अनेकांनी कमेंट केले आहे. तू खरंच लहापणीदेखील गोड दिसत होतास असे अनेकजण त्याला प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत. एवढेच नव्हे तर अभिनेत्री कृति खरबंदाने देखील किती गोड... अशी कमेंट या फोटोवर दिली आहे.
पुलकित सम्राट त्याच्या सिनेमांपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन अधिक चर्चेत असतो. सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत त्याने लग्न केले होते. पण लग्नानंतर काहीच महिन्यात त्याने तिला घटस्फोट दिला. या घटस्फोटाचे कारण यामी गौतम असल्याचे बोलले गेले होते. आता पुलकित पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. पुलकित सम्राट कृति खरबंदाला डेट करतोय. दोघांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. सध्या पुलकित त्याच्या आगामी ‘तैश’ सिनेमाच्याच चित्रीकरणात बिझी आहे. याशिवाय नुकताच तो कृतिसोबत ‘पागलपंती’ या चित्रपटातही झळकला आहे. कृति आणि पुलकित वीरे की वेडिंग सिनेमात देखील एकत्र दिसले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.
कृतिने काही दिवसांपूर्वी पुलकितला डेट करत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. ती म्हणाली होती की, ‘ही अजिबात अफवा नाही. आम्ही दोघे एकमेकांना डेट करत आहोत. खरे सांगायचे तर मी कुणाला तरी डेट करतेय, हे सर्वप्रथम माझ्या पालकांना मला सांगायचे होते. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. सध्या मी हॅपी प्लेसमध्ये आहे. मी पुलकित सम्राटला डेट करतेय, हे सांगताना मला कुठलाही संकोच वाटत नाहीये.