पन्नासीतील किंगखानला लग्नाचा प्रस्ताव??
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 18:14 IST2016-07-12T12:44:25+5:302016-07-12T18:14:25+5:30
किंगखान शाहरूख खान ५० वर्षांचा झाला आहे. मात्र तरूणींमधील शाहरूखची क्रेझ काही कमी झालेली नाही. अनेकजणी त्याच्यापुढे प्रेमाचा प्रस्ताव ...
.jpg)
पन्नासीतील किंगखानला लग्नाचा प्रस्ताव??
क ंगखान शाहरूख खान ५० वर्षांचा झाला आहे. मात्र तरूणींमधील शाहरूखची क्रेझ काही कमी झालेली नाही. अनेकजणी त्याच्यापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवत असतात. एका मुलीने तर चक्क किंगखानपुढे लग्नाचा प्रस्तावच ठेवला म्हणे! त्याचे झाले असे की, शाहरूख त्याचे twitter हँडल # AsKSRK सेशन दरम्यान आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. याचवेळी एका मुलीने पहिल्याच प्रश्नात शाहरूखला ‘विल यू मॅरी मी’ असा प्रश्न केला. @Atharluvsrk नावाच्या एका twitter हँडलवरून हा प्रश्न विचारला गेला. मग काय, शाहरूखनेही खास शैलीत याचे उत्तर दिले. ‘लग्न..लग्न..कुणीच ‘मित्र’बनून राहू इच्छित नाही?’,असे उत्तर शाहरूखने दिले. किंगखानने आपल्या चाहतीचे मन न दुखवता अगदी सहजपणे तिचा प्रस्ताव नाकारला. पण यावरून एक गोष्ट तर सिद्ध झाली, ती म्हणजे किंगखान आजही तरूणींच्या ‘दिल की धडकन’ आहे.
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}Marry marry....doesn't anybody want to be 'friends' anymore??!! https://t.co/lXgwfB8qWD— Shah Rukh Khan (@iamsrk) 11 July 2016