रणबीर कपूर आणि माहिरा खानमधील रिलेशनशिपचा ‘हा’ घ्या पुरावा; शर्टवरून लागला सुगावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:31 IST2017-10-01T11:58:24+5:302017-10-01T17:31:08+5:30

रणबीर आणि माहिरा यांच्यातील रिलेशनशिपचा एक सुगावा आमच्या हाती लागला असून, तो बघून हे दोघे नात्यात आहेत यावर तुमचाही विश्वास बसेल ?

Proof of the relationship between Ranbir Kapoor and Mehra Khan; Shag! | रणबीर कपूर आणि माहिरा खानमधील रिलेशनशिपचा ‘हा’ घ्या पुरावा; शर्टवरून लागला सुगावा!

रणबीर कपूर आणि माहिरा खानमधील रिलेशनशिपचा ‘हा’ घ्या पुरावा; शर्टवरून लागला सुगावा!

लिवूडमध्ये सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्यातील नातेसंबंधांवरून जोरदार चर्चा रंगत आहे. काही दिवसांपासून हे दोघे कथित रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर दोघांचे न्यूयॉर्कमध्ये स्मोकिंग करतानाचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्यातील नातेसंबंधांवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले गेले. या फोटोंमुळे माहिराला ट्रोल करण्यात आले. पाकिस्तानी चाहत्यांनी तिच्यावर राग व्यक्त करताना तू पाकिस्तानात पाऊल ठेवू नकोस, असा तिला इशारा दिला. मात्र अशातही हे दोघे खरोखरच नात्यात आहेत काय? याविषयी संभ्रम आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला जे संकेत देणार आहोत, त्यावरून हे दोघे खरोखरच रिलेशनशिपमध्ये, असावेत असा तुमचा समज झाल्याशिवाय राहणार नाही. 

ALSO READ : रणबीर कपूरची कथित गर्लफ्रेंड माहिरा खान आहे एका मुलाची आई, आता हे फोटो होत आहेत व्हायरल!

रणबीरने नुकताच इंडस्ट्रीतील काही मित्र आणि परिवारासमवेत त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. पार्टीत करण जोहरपासून शाहरूख खान, आमीर खान, आलिया भट्ट यांसारख्या स्टार्सनी हजेरी लावली. यावेळी निर्माता करण जोहर याने रणबीर कपूरसोबतचा पार्टीतील एक सेल्फीही त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. सेल्फीत रणबीरने काळ्या आणि लाल रेषा असलेला शर्ट परिधान केला होता. आता तुम्ही म्हणाल की, माहिरासोबतचे रिलेशन आणि रणबीरचा शर्ट याचा काय संबंध? तर हाच लाल, काळ्या रेषांचा शर्ट त्यांच्यातील नात्यांचे संकेत देणारा आहे. 
 

होय, असाच शर्ट परिधान करून माहिरा खानने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मुलगा अजलानसोबत काढलेला हा फोटो आता पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला आहे. हा फोटो शेअर करताना माहिराने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘अजलानची मम्मा म्हणून निवड केल्याने माझा प्रत्येक दिवस आनंदी जातो. माझा एक आणि माझे एकमेव प्रेम! जेव्हा माहिराने हा फोटो शेअर केला तेव्हा तिने परिधान केलेला शर्ट आणि करणसोबतच्या सेल्फीत रणबीरने परिधान केलेला शर्ट सारखाच आहे. त्यामुळे एकच शर्ट या दोघांनी परिधान तर केलेला नसेल ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक एकसारखे शर्ट असू शकतात, परंतु माहिरा आणि रणबीरने परिधान केलेला सारखाच शर्ट हा योगायोग असू शकतो काय? असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. 
 

असो, काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कमध्ये माहिरा आणि रणबीर स्मोकिंग करताना स्पॉट झाल्याने त्यांच्यातील नात्याविषयी चर्चा रंगत आहे. रणबीरने जरी या चर्चा व्यर्थ असल्याचे म्हटले असले तरी, त्यात फारसे तथ्य वाटत नाही. शिवाय रणबीरच्या समर्थनार्थ जरीन खानही मैदानात उतरल्याने हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. 

Web Title: Proof of the relationship between Ranbir Kapoor and Mehra Khan; Shag!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.