रेल्वेत ‘रईस’चे प्रमोशन भोवले; शाहरूख खानविरूद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 11:10 IST2017-02-15T05:40:58+5:302017-02-15T11:10:58+5:30
रेल्वेत ‘रईस’चे प्रमोशन भोवले; शाहरूख खानविरूद्ध गुन्हा दाखल ‘रईस’च्या प्रमोशनसाठी रेल्वेत प्रवास करणे बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याला चांगलेच ...

रेल्वेत ‘रईस’चे प्रमोशन भोवले; शाहरूख खानविरूद्ध गुन्हा दाखल
ेल्वेत ‘रईस’चे प्रमोशन भोवले; शाहरूख खानविरूद्ध गुन्हा दाखल
‘रईस’च्या प्रमोशनसाठी रेल्वेत प्रवास करणे बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याला चांगलेच महागात पडले. होय, यासंदर्भात शाहरूखविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘रईस’च्या प्रमोशनवेळी कोटा रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या संपत्तीला नुकसान पोहोचवण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे न्यायालयाच्या निदेर्शानुसार शाहरूखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . कोटा रेल्वे स्थानकावर स्टॉल लावणाºया विक्रम सिंग नामक विक्रेत्याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने शाहरूखविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
23जानेवारी रोजी शाहरूखची गाडी रेल्वे स्थानकावर आली असता त्याच्या चाहत्यांनी गोंधळ घातला. आॅगस्ट क्रांती एक्सप्रेसच्या दरवाजात उभं राहून शाहरूखने त्याच्या चाहत्यांच्या दिशेने काही वस्तू फेकल्या, त्या वस्तू मिळवण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी धावपळ केली आणि गोंधळ निर्माण झाला. या दरम्यान माझ्या दुकानाचं नुकसान झालं आणि मी स्वत:ही जखमी झालो, असं त्याने तक्रारीत म्हटलं आहे. ‘रईस’च्या प्रमोशनसाठी शाहरूखने रेल्वेतून प्रवास करण्याची शक्कल लढवली होती. यासाठी त्याने आॅगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून मुंबई ते दिल्ली असा प्रवास त्याने केला होता. यात एका माजी नगरसेवकाला नाहक जीव गमवावा लागला होता. चित्रपट प्रमोशसाठी मुंबई ते दिल्ली प्रवास आॅगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसने करणार असल्याचे ट्विट शाहरूखने केले होते. त्यामुळे आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मुंबईतही त्याचे चाहतेही मोठ्या प्रमाणावर पोहोचले होते. वडोदरा रेल्वे स्थानकावर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. या गर्दीत समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक फरीद खानही उपस्थित होते.
ALSO READ : So Sad SRK!! : ‘रईस’ शाहरूख खान रेल्वेनी आला पण एकाचा नाहक जीव गेला...!!
शाहरूख खानचा मुलगा अबराम जेव्हा नाचतो ‘लैला मैं लैला’ वर...
गाडी वडोदरा स्थानकात पोहोचताच शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उतावीळ झालेत. यांनी रेल्वेचं अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्थानकात एकच गोंधळ माजला. पोलिसांनाही गर्दी आवरणे कठीण होऊन बसले. अखेर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करत लाठीमार करावा लागला होता. त्यामुळे चेंगराचेंगरीही झाली होती. या चेंगराचेंगरीत फरीद खान यांनाही धक्काबुक्की होऊन ते जमिनीवर कोसळले होते. शिवाय त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरीत पोलिसांसह अन्य चार जण जखमी झाले होते.