गुल पनागने केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 15:49 IST2016-06-01T10:19:05+5:302016-06-01T15:49:05+5:30
नवी दिल्ली येथे झालेल्या आफ्रिकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी गुल पनागने असंतोष व्यक्त करताना या घटनेचा निषेध केला आहे. गेल्या काही ...

गुल पनागने केला निषेध
न ी दिल्ली येथे झालेल्या आफ्रिकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी गुल पनागने असंतोष व्यक्त करताना या घटनेचा निषेध केला आहे. गेल्या काही दिवसात राजधानीमध्ये झालेल्या हल्ल्यात विशेषत: कांगोच्या युवकाच्या हत्येनंतर लोकांनी मोठ्या प्रमाणावर राग व्यक्त केला आहे. अभिनेत्री, राजकारणी असलेल्या गुल पनागने ट्विटरद्वारा आपला संताप मांडला. ‘आपल्या पूर्वजांनी घटनेत काय म्हटले आहे, हे विसरता कामा नये. भारताला यामुळे युद्धाचे स्वरुप येईल आणि समाजात चुकीचा संदेश जाईल’ असे तिने म्हटले आहे. गुल ही आम आदमी पार्टीची सदस्य आहे.