निर्मात्याची दिग्दर्शक बायको दिव्या खोसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:18 IST2016-02-04T05:46:02+5:302016-02-04T11:18:00+5:30
‘यारियां’ या चित्रपटाने एकदम प्रकाशझोतात आलेली दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार ही ‘ सनम रे ’ या चित्रपटाच्या तयारीत आहे. ...

निर्मात्याची दिग्दर्शक बायको दिव्या खोसला
‘ ारियां’ या चित्रपटाने एकदम प्रकाशझोतात आलेली दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार ही ‘ सनम रे ’ या चित्रपटाच्या तयारीत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. निर्माता भूषणकुमार यांची ती पत्नी. तिने नुकताच एका मुलाखतीत आपला हा प्रवास उलगडला.
दिव्या म्हणाली, ‘यारियां’ हा चित्रपट जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. लगेच मार्चमध्ये ‘सनम रे चे कथानक डोक्यात घुमू लागले होते. कधी आपल्या परिश्रममामुळे आपले भाग्य बदलू शकतो. पहिला चित्रपट चांगले यश देईल, अशी आशा होती. ती खरी ठरली. भूषणचा माझ्यावर फारसा विश्वास टाकायला तयार नव्हता.पण दिग्दर्शनातील माझ्या पदार्पणानंतर तो माझ्याकडे धावत येऊन म्हणाला, माझ्यासाठी एक चित्रपट बनव. त्याला माझ्याकडून ‘यारियां-2’ हवा होता. पण माझ्या हृदयात ‘सनम रे’ची कल्पना घुमत होती.
निर्मात्याची पत्नी असूनही संघर्ष करावा लागला का, या प्रश्नावर दिव्या म्हणाली, तुम्ही कोण आहात, कुणाची पत्नी आहात, यावर काहीही अवलंबून नसते. प्रवासात संघर्ष हा ठरलेलाच असतो. आपल्या सुपरस्टार्सनाही संघर्ष करावा लागला आहेच. मी निर्मात्याची पतन्ी असले तरी माझे पाय कायम जमिनीवरच राहिले. मी अजुनही स्वत:ला मध्यमवर्गीय मुलगी समजते. आजही घरातून बाहेर पडताना मी स्वत: लाइट बंद करते. मुलांनाही तेच शिकवते. मी एका रात्रीत दिग्दर्शक बनले नाही. मी कित्येक वर्षे या क्षेत्राचा अभ्यास केला. निरीक्षण केले. एका रात्रीतून काहीही घडत नाही.
.jpg)
ती म्हणाली, सुरुवातीला आठ वर्षे भूषणकुमार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करीत होते. मी काही म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शित केले होते. त्यामुळे त्याने माझ्यावर विश्वास टाकला. कंपनीची प्रतिष्ठा कमी होईल, असे काहीही घडू नये यासाठी त्याचा प्रयत्न असतो. मला अभिनयात वेळ देणे शक्य नव्हते. तेव्हा छोट्या बाळाचाही सांभाळ करायचा होता. माझे प्राधान्य त्याला होते. ‘सनम रे’ मध्ये मी विशेष नृत्याद्वारे सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
दिव्या म्हणाली, ‘यारियां’ मध्ये एक धोका पत्कराला होता, तो म्हणजे यात पाच नवे चेहरे होते. ‘सनम रे’ साठी ऋषी कपूर यांना विशेष भूमिकेसाठी विचारण्यात आले पण त्यांनी नकार दिला होता. त्यांना आजोबाची भूमिका करायची नव्हती. पण आमच्या पे्रमाखातर ते कथा ऐकून घ्यायला आले आणि होकार दिला.
तिने सांगितले, मी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबातून आले आहे. मला माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईला यायचे होते. यासाठी आईने माझ्या बाबांचे मन वळविले. येथे वर्षभरात सात घरे बदलावी लागली. दरम्यान भूषणशी ओळख झाली आणि आम्ही लग्न केले. मी धोका प्तकारायची तयारी ठेवते आणि माझा स्वत:वर खूप विश्वास आहे.या बळावर मी पुढे चालत राहते. दुसरे म्हणजे मी केवळ दिवसाची शिफ्ट करते. मला सायंकाळी घरी पोहचून मुलाला वेळ द्यायचा असतो. प्रत्येक भारतीय स्त्रीने कुटुंबालाच प्राधान्य दिले पाहिजे.