​प्रियांकाचा नवा विक्रम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 13:37 IST2016-09-16T07:55:46+5:302016-09-16T13:37:52+5:30

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत यशस्वीतेची गरुड झेप घेणाऱ्या प्रियांका चोप्राने सर्व भारतीय अभिनेत्रींना मागे टाकत एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर ...

Priyanka's new record! | ​प्रियांकाचा नवा विक्रम !

​प्रियांकाचा नवा विक्रम !


/>बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत यशस्वीतेची गरुड झेप घेणाऱ्या प्रियांका चोप्राने सर्व भारतीय अभिनेत्रींना मागे टाकत एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. जगातील सर्वात जास्त फीस घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत प्रियांकाने मजल मारली असून या यादीत विक्रमी 73 कोटी रुपयांच्या फीससह आठवं स्थान मिळालं आहे. हा विक्रम नोंदवणारी  प्रियांका पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे.
नुकतीच फोर्ब्सकडून जगात सर्वात जास्त फीस घेणाऱ्या हायपेड अभिनेत्रींची यादी जाहीर करण्यात आली. हॉलिवूड अभिनेत्री 288 कोटी रुपये एवढ्या फीससह पहिल्या स्थानावर आहे.

यादीतील टॉप 10 अभिनेत्री
1) सोफिया वजार्रा 288 कोटी
2) कॅली कुओको 164 कोटी
3) मिंडी कॅलिंग 100 कोटी
4) मॅरिस्का हार्टिगे 97 कोटी
5) अ‍ॅलेन पॉम्पियो 97 कोटी
6) कॅरी वॉशिंग्टन 90 कोटी
7) स्टॅना कॅटिक 80 कोटी
8) प्रियांका चोप्रा 73 कोटी
9) जुलियाना मारगुलिस 70 कोटी
10) ज्यूली बॉवेन 67 कोटी

Web Title: Priyanka's new record!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.