प्रियांकाचा मराठी चित्रपट ‘व्हेंटीलेटर’चे पोस्टर आउट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 14:31 IST2016-09-01T09:01:11+5:302016-09-01T14:31:11+5:30
प्रियंका चोप्रा निर्मित पहिला मराठी चित्रपट 'व्हेंटीलेटर'चे पोस्टर नुकतेच प्रियंकाने सोशल मीडियावर प्रसिध्द केले आहे.
.jpg)
प्रियांकाचा मराठी चित्रपट ‘व्हेंटीलेटर’चे पोस्टर आउट !
प्रियंका या चित्रपटात पाहुणी कलाकार असणार आहे. ‘माझा पहिला मराठी चित्रपट 'व्हेंटीलेटर'चे पोस्टर. पर्पल पेब्बल पिक्चर्सचे अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया,’ असे प्रियंकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
‘फन. फॅमिली. फेस्टीव्हल.’ ही अक्षरे पोस्टरवर अधोरेखीत करण्यात आली आहेत.
'व्हेंटीलेटर'मध्ये मराठीतील दिग्गज कलाकार काम करीत आहेत. फेरारी की सवारी दिग्दर्शित केलेल्या राजेश म्हापूसकर यांनी या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे.