प्रियंका व्हायचे होते ‘पद्मावती’; दीपिकाने हिसकावली संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 20:26 IST2016-06-06T14:56:10+5:302016-06-06T20:26:10+5:30
‘बाजीराव मस्तानी’नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘पद्मावती’ हा मेगाबजेट सिनेमा घेऊन येणार आहेत. या चित्रपटात काम करण्यासाठी प्रियंका चोपडा ...

प्रियंका व्हायचे होते ‘पद्मावती’; दीपिकाने हिसकावली संधी
‘ ाजीराव मस्तानी’नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘पद्मावती’ हा मेगाबजेट सिनेमा घेऊन येणार आहेत. या चित्रपटात काम करण्यासाठी प्रियंका चोपडा अगदी उतावीळ होती. संजय यांना प्रियंकाने तसे कळवलेही होते. पण प्रियंकाची ही संधी दीपिका पदुकोण हिने हिसकावली. संजय लीला भन्साळींच्या मते, पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका अगदी फिट बसते. भन्साळींना या चित्रपटासाठी लांब पायांची अर्थात उंच मुलगी हवी होती. दीपिकाचा उंची, तिचा बांधा हे पाहून भन्साळींनी तिला पसंती दिली. साहजिक प्रियंकाला त्यांना नकार द्यावा लागला. मग काय?? यावेळी नाही तरी भविष्यात तुझ्यासोबत नक्की काम करणार, अशी समजूत भन्साळींनी काढली. नेक्स्ट टाईम बेटर लक़.पीसी..!!
.
.