Priyanka Nick wedding: या कारणामुळे प्रियांका चोप्रा आली अचानक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 01:52 PM2018-11-28T13:52:14+5:302018-11-28T14:04:23+5:30

गेल्या काही आठवड्यांमध्ये मीडियामध्ये सर्वाधिक चर्चित राहिलेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर आता प्रियांका आणि निकचा विवाह चर्चेत आलाय.

Priyanka Nick wedding: priyanka chopra on top chart due to her marriage news | Priyanka Nick wedding: या कारणामुळे प्रियांका चोप्रा आली अचानक चर्चेत

Priyanka Nick wedding: या कारणामुळे प्रियांका चोप्रा आली अचानक चर्चेत

googlenewsNext
ठळक मुद्देनिक जोनास आणि ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राच्या लग्नाशी संबंधित घडामोडी वर्तमानपत्राच्या मथळ्यांमध्ये सतत दिसून येत आल्याने स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ‘न्यूजप्रींट मीडिया’मध्ये प्रियांका सर्वाधिक चर्चित राहिलेली अभिनेत्री बनली आहे.निक आणि प्रियांकाच्या लग्नात कोण-कोण सेलेब्स येणार, लग्न कुठे, केव्हा होणार.. ते अगदी वर-वधू कोणत्या डिझाइनरचे कपडे परिधान करणार, अशा अनेक बातम्या गेल्या आठवड्याभरात सातत्याने प्रत्येक भारतीय वृत्तपत्रात वाचायला मिळाल्या होत्या. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाद्वारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका चोप्राच्या लग्नविषयक बातम्या रोज भारतीय मीडियामध्ये छापून येत आहेत. इंटरनॅशनल सिंगर निक जोनास आणि ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राच्या लग्नाशी संबंधित घडामोडी वर्तमानपत्राच्या मथळ्यांमध्ये सतत दिसून येत आल्याने स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ‘न्यूजप्रींट मीडिया’मध्ये प्रियांका सर्वाधिक चर्चित राहिलेली अभिनेत्री बनली आहे.

निक आणि प्रियांकाच्या लग्नात कोण-कोण सेलेब्स येणार, लग्न कुठे, केव्हा होणार.. ते अगदी वर-वधू कोणत्या डिझाइनरचे कपडे परिधान करणार, अशा अनेक बातम्या गेल्या आठवड्याभरात सातत्याने प्रत्येक भारतीय वृत्तपत्रात वाचायला मिळाल्या होत्या. त्यामुळेच गेल्या काही आठवड्यांमध्ये मीडियामध्ये सर्वाधिक चर्चित राहिलेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर आता प्रियांका आणि निकचा विवाह चर्चेत आलाय. यामुळेच तर गेल्या आठवड्यात तिसऱ्या स्थानी असलेली प्रियंका अचानक लोकप्रियतेत अग्रणी स्थानावर आली आहे.

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाद्वारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल याविषयी सांगतात, निक जोन्स आणि प्रियांका चोप्रा दोघांचीही लोकप्रियता विश्वभरात आहे. यामुळेच वृत्तपत्रांमध्ये दीपिका-रणवीरपेक्षा जास्त निक आणि प्रियांकाला प्रसिद्धी मिळत असलेली दिसतेय. प्रियांकाचा शाही विवाह आणि दरदिवशी त्याविषयक येत असलेल्या बातम्यांमुळे प्रियांका न्यूज प्रिंटमध्ये सर्वाधिक चर्चित स्टार बनली आहे. आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोताद्वारे डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश असतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा येत्या २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवन येथे लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र तेवढेचं उपस्थित राहणार आहेत. .२ डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी  पार पडणार आहे.  लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत होणार आहे.

प्रियांका सोशल मीडियाद्वारे तिच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट तिच्या चाहत्यांना कळवत आहे. 

 

 

Web Title: Priyanka Nick wedding: priyanka chopra on top chart due to her marriage news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.