Priyanka Nick Wedding: निक-प्रियंकाच्या परदेशी वऱ्हाड्यांचा विमानतळाबाहेर जल्लोष, पहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 19:21 IST2018-11-30T19:20:35+5:302018-11-30T19:21:12+5:30
अभिनेत्री प्रियांका चोप्रा व अमेरिकन गायक निक जोनास लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

Priyanka Nick Wedding: निक-प्रियंकाच्या परदेशी वऱ्हाड्यांचा विमानतळाबाहेर जल्लोष, पहा व्हिडिओ
अभिनेत्री प्रियांका चोप्रा व अमेरिकन गायक निक जोनास लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्न सोहळ्यासाठी जगभरातून वऱ्हाडी भारतात येत आहेत. बॉलिवूडच्या दिग्गजांसह जगभरातील सेलेब्रिटी या लग्नासाठी आमंत्रित आहेत. या लग्नासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनी विमानतळाबाहेर पडताच पीसी पीसी असा जल्लोष करीत आपला आनंद व्यक्त केला.
प्रियंका आणि निकचा विवाह २ आणि ३ डिसेंबर रोजी जोधपूरच्या उमेद भवन पॅलेस हॉटेलमध्ये पार पडणार आहे. हा शाही विवाह हिंदु आणि ख्रिश्चन पद्धतीने पार पडणार आहे. या लग्नासाठी पोहोचलेल्या परदेशी वऱ्हाडींचा विमानतळाबाहेरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
प्रियांका व निकच्या शाही लग्नासाठी जोधपूरचे उमेद भवन अगदी नववधूप्रमाणे नटले आहे. अख्खा महल लाईट्सच्या झगमगाटाने न्हाऊन निघाले आहे. उमेद भवनाचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
प्रियांका व निकच्या लग्नाचा मंडपही सजला आहे. अगदी शाही पद्धतीने तो सजवण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रियांका व निक हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहेत. हिंदू पद्धतीच्या विवाहात निक अगदी राजसी थाटात बग्घीवरून एन्ट्री घेणार आहे. प्रियांका व निकच्या लग्नामुळे उमेद भवन सामान्यजनांसाठी पाच दिवस बंद ठेवण्यात आले आहे.