Priyanka Nick Wedding: राजस्थानमधील निवडणुकांमुळे प्रियांका चोप्राच्या लग्नात आले हे विघ्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 15:13 IST2018-11-28T15:07:40+5:302018-11-28T15:13:44+5:30
प्रियांका आणि निकचे लग्न उमेद भवनमध्ये होणार असले तरी लग्नाच्याआधीचे काही विधी म्हणजेच मेहेंदीचा कार्यक्रम आणि संगीत सेरेमनी मेहरानगड किल्ल्यात होणार होते.

Priyanka Nick Wedding: राजस्थानमधील निवडणुकांमुळे प्रियांका चोप्राच्या लग्नात आले हे विघ्न
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची लग्नघटिका जवळ आलीय, लगीनघाई सुरू झालीय. जोधपूरच्या उमेद भवन येथे प्रियांका आणि निक लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांचे लग्न २ डिसेंबरला होणार असून लग्नाच्या आधीचे विधी आजपासून सुरू झाले आहेत. प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वी आई मधू चोप्रासोबत जोधपूरला गेली होती. येथे त्यांनी उमेद भवन आणि मेहरानगड येथे सुरू असलेल्या लग्नाच्या तयारीची पाहणी केली होती. प्रियांका आणि तिचे कुटुंबीय गेल्या कित्येक दिवसांपासून या लग्नाची तयारी करत आहे. या लग्नात कोणतीही कमतरता येऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पण प्रियांका आणि निकचे लग्न व्हायच्या आधी त्यांच्या लग्नात एक विघ्न आलेले आहे.
प्रियांका आणि निकचे लग्न उमेद भवनमध्ये होणार असले तरी लग्नाच्याआधीचे काही विधी म्हणजेच मेहेंदीचा कार्यक्रम आणि संगीत सेरेमनी मेहरानगड किल्ल्यात होणार होते. त्यासाठी प्रियांकाने राजस्थान पोलिसांकडे सिक्युरीटीची मागणी केली होती. प्रियांकाची पर्सनल सिक्युरीटी तिथे उपस्थित असली तरी पोलिसांनी देखील मेहरानगड येथे सुरक्षा द्यावी अशी प्रियांकाच्या टीमने विनंती केली होती. पण राजस्थानमध्ये निवडणूक असल्याने पोलिसांना तिला सिक्युरीटी पुरवणे शक्य नाहीये आणि त्यामुळेच प्रियांकाच्या लग्नाच्या आधीचे सगळे विधी उमेद भवन येथे होणार आहेत.
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा येत्या २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवन येथे लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र तेवढेच उपस्थित राहणार आहेत. सुमारे ८० लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. लग्नात सामील होणाऱ्या पाहुण्यांना प्रियांका आणि निक एक खास भेट देणार आहेत. या पाहुण्यांना स्पेशल पर्सनलाईज्ड चांदीचे नाणे भेट म्हणून दिले जाणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला ‘एनपी’ म्हणजे निक आणि प्रियांका या नावाचे इंग्रजी आद्याक्षर लिहिलेले असेल. तर दुसऱ्या बाजूला गणेश आणि लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असेल. २९ नोव्हेंबरपासून या लग्नाचे विधी सुरू होणार आहेत. यासाठी जोधपूरचे उमेद भवन पाच दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे.