प्रियांकाने जाहिर केली क्वांटिकोच्या तिसऱ्या सीजनची डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:22 IST2018-01-10T11:38:00+5:302018-04-03T14:22:44+5:30

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या अभिनयाची जादू बॉलिवूड हॉलिवूडपर्यंत आहे. प्रियांकाने क्वांटिको सिरिजच्या तिसऱ्या सीजनचा टीझर  रिलीज केला आहे. टीजर ...

Priyanka has revealed that the third season of Quantico has a date | प्रियांकाने जाहिर केली क्वांटिकोच्या तिसऱ्या सीजनची डेट

प्रियांकाने जाहिर केली क्वांटिकोच्या तिसऱ्या सीजनची डेट

लिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या अभिनयाची जादू बॉलिवूड हॉलिवूडपर्यंत आहे. प्रियांकाने क्वांटिको सिरिजच्या तिसऱ्या सीजनचा टीझर  रिलीज केला आहे. टीजर रिलीज झाल्याची माहिती प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर टीझरचे काही फोटो शेअर केले आहेत. टीझर रिलीजसोबतच तिने क्वांटिकोच्या तिसऱ्या सीजनच्या डेटचा खुलासा देखील केला आहे. क्वांटिकोच्या मागच्या सीझनमध्ये देखील प्रियांका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. ‘क्वांटिको’ या लोकप्रीय अमेरिकन सीरिजच्या दोन्ही सीझनमध्ये प्रियांका एलेक्स पारिशची भूमिका साकारताना दिसली होती. क्वांटिकोचा टीझर रिलीज झाल्या झाल्या तो चर्चेचा विषय बनला आहे.‘क्वांटिको3’तील प्रियांकाची भूमिका जगभरातील लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती.  याच भूमिकेने प्रियांकाला हॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली. कोट्यवधी लोकांची मने तिने जिंकलीत.
 
 

प्रियांका इन्स्टाग्रामवर टीजर शेअर करताना लिहिले आहे, मी आपल्या फॅन्ससोबत क्वांटिकोचा टीझर शेअर करण्यापासून स्वत:ला थांबवू नाही शकले. क्वांटिको 3 द रिटर्न ऑफ एलेक्स पेरिश 26 एप्रिलला रिलीज होणार आहे. सध्या प्रियांका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे.  लवकरच प्रियांकाचे आणखी दोन हॉलिवूड सिनेमे रिलीज होणार आहेत  मध्यंतरी प्रियांका पी.टी. उषा हिच्या बायोपिकमध्ये झळणार अशी बातमी होती. अर्थात प्रियांकाने या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. प्रियांका शेवटची ‘बाजीराव मस्तानी’मध्ये दिसली होती. तसेच ‘व्हेंटिलेटर’च्या यशानंतर प्रियांका पुन्हा एकदा मराठी चित्रपट घेऊन येत आहे. प्रियांका चोप्राच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत दुसºया ‘फायरब्रॅण्ड’ या मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंकाच्या होम प्रॉडक्शन पर्पल पेबल पिक्चर्सकडून आमच्या आगामी ‘फायरब्रॅण्ड’ या चित्रपटासोबत २०१८ चे स्वागत’ असे ट्विट प्रियांकाने केले होते. दिग्दर्शिका अरुणा राजे पाटील यांच्यासोबत आमच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रियंकाने ‘व्हेंटिलेटर’ या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मपुस्कर यांनी केले. या चित्रपटाला ६४ व्या राष्टÑीय पुरस्कार समारंभात तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले 

Web Title: Priyanka has revealed that the third season of Quantico has a date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.