​ एमी अवार्ड्समध्ये निवेदिकेने केली चूक अन् नाराज झाले प्रियांका चोप्राचे चाहते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 14:42 IST2017-09-18T09:12:15+5:302017-09-18T14:42:15+5:30

नेहमीप्रमाणे प्रियांका एमी अवार्ड्सच्या रेड कार्पेटवर उतरली अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. पण याचदरम्यान एक गफलत झाली.

Priyanka Chopra's wishes made by Amitabh Bachchan for Amy Awards | ​ एमी अवार्ड्समध्ये निवेदिकेने केली चूक अन् नाराज झाले प्रियांका चोप्राचे चाहते!

​ एमी अवार्ड्समध्ये निवेदिकेने केली चूक अन् नाराज झाले प्रियांका चोप्राचे चाहते!

स एन्जेलिस येथे झालेल्या ६९व्या ‘प्राइमटाइम एमी’ पुरस्कार सोहळ्यात ‘क्वांटिको गर्ल’  प्रियांका चोप्रा डिझाईनर बलमेनने डिझाईन केलेल्या पांढ-या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. नेहमीप्रमाणे प्रियांका एमी अवार्ड्सच्या रेड कार्पेटवर उतरली अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. व्हाईट ड्रेसमध्ये प्रियांका कमालीची सुंदर दिसत होती. तिच्या या अदा सगळ्यांनाच सुखावून गेल्या. पण याचदरम्यान एक गफलत झाली. कार्यक्रमात निवेदिकेने प्रियांकाच्या नावाचा चुकीचा उच्चार केला.‘आऊटस्टँडिंग व्हरायटी टॉक सीरिज’ हा पुरस्कार सादर करण्यासाठी  अभिनेता अँथनी अँडरसनसोबत प्रियांका स्टेजवर पोहोचली खरी पण शोच्या होस्टने तिच्या आडनावाचा उल्लेख ‘चोपा’ असा केला. मग काय, सोशल मीडियावर या घटनेची चर्चा व्हायला वेळ लागला नाही. प्रियांकाचे चाहते यामुळे भलतेच नाराज झालेत. ‘काय खरचं प्रियांका चोप्राच्या आडनावाचा उच्चार इतका कठीण आहे?’ असा उपरोधिक प्रश्न एका युजरने केला.






अर्थात प्रियांकाने आडनावाचा चुकीचा उच्चार फार काही मनावर घेतला नाही. उलट अतिशय मोजक्या पण नेमक्या शब्दांत भाषण देऊन सगळ्या उपस्थितांना तिथे प्रभावित केलं. प्रियांका यंदा दुसºयांदा एमी  पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर झळकली. गेल्या वर्षी तिने ‘अ‍ॅवेन्जर्स’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाºया अभिनेता टॉम हिडलस्टनसोबत तिने पुरस्कार सादर केला. गतवर्षी प्रियांका रेड कलरच्या गाऊनमध्ये एमीच्या रेडकार्पेटवर उतरली होती. यंदा तिने व्हाईट गाऊनला पसंती दिली. या गाऊनमधील एक व्हिडिओही तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. सध्या प्रियांका हॉलिवूडमध्ये प्रचंड बिझी आहे.‘अ किड लाइक जॅक’ आणि ‘इजंट इट रोमॅन्टिक’ या दोन हॉलिवूडपटांमध्ये ती भूमिका साकारणार आहे.  
 अलीकडे एका वादग्रस्त विधानामुळे प्रियांका चर्चेत आली होती.  प्रियांका टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये नुकतेच प्रियांकाने प्रोड्यूस केलेल्या ‘पहुना’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग पार पडले.यावेळी दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने सिक्कीमचा ‘दहशतवादाने पोळलेले राज्य’ असा उल्लेख केला होता. मग काय तिच्या या विधानानंतर सोशल साईटवर लोकांनी प्रियांकाला चांगलेच घेरले होते.अखेर प्रियांकाना या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागली होती.

Web Title: Priyanka Chopra's wishes made by Amitabh Bachchan for Amy Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.