म्हणून प्रियंका चोप्राने डेस्टीनेशन वेडींगसाठी केली जोधपुरची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 20:00 IST2018-11-17T20:00:00+5:302018-11-17T20:00:00+5:30

लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. सध्या प्रियंकाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती  तिचे लग्न स्पेशल बनवण्यासाठी खूप तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Priyanka Chopra’s mother Madhu Chopra reveals why they chose Jodhpur for wedding venue | म्हणून प्रियंका चोप्राने डेस्टीनेशन वेडींगसाठी केली जोधपुरची निवड

म्हणून प्रियंका चोप्राने डेस्टीनेशन वेडींगसाठी केली जोधपुरची निवड

लग्न घटिका समीप आली करा हो लगीनघाई म्हणत प्रियंका चोप्राचे लग्नासाठी काऊंटडाऊन  सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या ती लग्नाच्या तयारीत बिझी असली तरीही प्रियंका तिच्या मनात दडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तशी ती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. सध्या प्रियंकाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती  तिचे लग्न स्पेशल बनवण्यासाठी खूप तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच प्रियंकाची आई डॉ. मधु चोप्रा देखील खास प्लॅनिंगमध्ये बिझी असल्याचे पाहायला मिळाले.

मधु चोप्रा लग्नाच्या तयारींसाठी जोधपुरमध्ये पोहोचल्या होत्या. जोधपुर एयपोर्टमधून निघताना प्रियांकाच्या आईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये त्या म्हणत आहेत की, जोधपुर त्यांचे आवडते शहर आहे. यामुळे संपुर्ण जग सोडून ते आपल्या मुलीचे या ठिकाणी लग्न करणार असल्याचे त्यांनी ठरवले असल्याचे या व्हीडीओतू स्पष्ट होत आहे. उम्मेद भवन पॅलेसमध्ये येत्या १ डिसेंबरला हे लग्न थाटात पार पडणार आहे. उम्मेद भवन पॅलेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून हे लग्न भव्य व्हावे यासाठी तयारी केली जात आहे. प्रियांकाने आपल्या वेडिंग फंक्शनचे राइट्स एका मॅजझीनला विकले असल्याचे बोलले जात आहे.

प्रियांकाने एंगेजमेंटसाठी ब्रेसलेट, नेकलेससोबतच ज्वेलरी जोधपुरमध्येच तयारी करावी लागली. यामुळे प्रियांका ज्वेलरी पसंत करण्यासाठीही जोधपुरमध्ये जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले असून ३० नोव्हेंबरपासून प्रियांकाच्या लग्नाचे विधी सुरू होणार असल्याची चर्चा आहे. प्रियांका आणि निक यांनी आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.

Web Title: Priyanka Chopra’s mother Madhu Chopra reveals why they chose Jodhpur for wedding venue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.