हॉलिवूडमधून प्रियांका चोप्रासाठी आली सर्वांत वाईट बातमी, वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 21:24 IST2018-05-12T15:54:20+5:302018-05-12T21:24:20+5:30
देसी गर्ल प्रियांका चोप्राला एक मोठा झटका बसणारी बातमी समोर आली आहे. होय, ज्या शोमुळे प्रियांकाला हॉलिवूडचे दरवाजे उघडून ...

हॉलिवूडमधून प्रियांका चोप्रासाठी आली सर्वांत वाईट बातमी, वाचा सविस्तर!
द सी गर्ल प्रियांका चोप्राला एक मोठा झटका बसणारी बातमी समोर आली आहे. होय, ज्या शोमुळे प्रियांकाला हॉलिवूडचे दरवाजे उघडून दिले गेले, तोच शो आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीआरपीच्या बाबतीत सातत्याने घसरण होत असल्याने हा शो बंद केला जाणार आहे. एबीसीने हा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन सीजनमध्ये प्रियांका या शोमध्ये अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळाली. तिसºया सीजनमध्येही ती एफबीआय एजंटच्या भूमिकेत बघावयास मिळणार होती.
गेल्या महिन्यात या शोच्या तिसºया भागाची सुरुवात करण्यात आली होती. मात्र १३ व्या एपिसोडनंतर हा शो बंद केला जाणार आहे. या शोचा शेवटचा एपिसोड ३ जुलै रोजी प्रसारित केला जाणार आहे. दरम्यान, प्रियांकाला या शोसाठी पीपुल च्वाइस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे. मात्र या शोचा तिसरा सीजन म्हणावी तशी लोकप्रियता मिळवू शकला नसल्याने शो बंद करण्याचा मोठा आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे.
![]()
दरम्यान, प्रियांकाने २०१७ मध्ये आलेल्या ‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. चित्रपटात ती निगेटीव्ह भूमिकेत बघावयास मिळाली. आता प्रियांका लवकरच भारतात परतणार असून, बॉलिवूड चित्रपटांच्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात करणार आहे. ती सलमान खानसोबत ‘भारत’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी केली जात असून, प्रियांका त्यासाठी लवकरच मायदेशी परतण्याची शक्यता आहे.