30 हजारचं टेबल क्लॉथ अन् 14 हजारांचा नॅपकिन; 'देसी गर्ल' विदेशात विकतीये भारतीय वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 15:08 IST2022-07-03T15:07:48+5:302022-07-03T15:08:59+5:30

Priyanka chopra: सोना होम (Sona Home) या ऑफिशिअल वेबसाईटवर प्रियांकाने काही वस्तूंचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यामध्ये काही भारतीय वस्तूंची झलक दाखवण्यात आली आहे.

priyanka chopras homeware brand sona home slammed over ridiculous expensive prices | 30 हजारचं टेबल क्लॉथ अन् 14 हजारांचा नॅपकिन; 'देसी गर्ल' विदेशात विकतीये भारतीय वस्तू

30 हजारचं टेबल क्लॉथ अन् 14 हजारांचा नॅपकिन; 'देसी गर्ल' विदेशात विकतीये भारतीय वस्तू

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka chopra) अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर तिचं बस्तान विदेशातच मांडलं आहे. त्यामुळे प्रियांका सध्या बॉलिवूडसह हॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकताना दिसते. विशेष म्हणजे कलाविश्वासह देसी गर्ल वेगवेगळ्या क्षेत्रांमध्येही नशीब आजमावत आहे. विदेशात प्रियांकाचं सोना नावाचं रेस्टॉरंट आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, आता तिने सोना होम या नावाने एक नवा व्यवसाय सुरु केला आहे. परंतु, या ब्रँड अंतर्गत ती विकत असलेल्या वस्तूंची किंमत थक्क करणारी आहे.

अलिकडेच प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या सोना होम या नव्या वेंचरची ओळख नेटकऱ्यांना करुन दिली. या नव्या वेंचरच्या माध्यमातून प्रियांका भारतीय वस्तू आता विदेशात विकणार आहे. विशेष म्हणजे या वस्तूंची किंमत प्रचंड महाग असून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत.

सोना होम (Sona Home) या ऑफिशिअल वेबसाईटवर प्रियांकाने काही वस्तूंचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यामध्ये काही भारतीय वस्तूंची झलक दाखवण्यात आली आहे. या प्रत्येक वस्तूंमध्ये भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. प्रियांकाने हा व्यावसाय मनीष गोयल यांच्यासोबत सुरु केला आहे.

काय आहे सोना होमच्या वस्तूंची किंमत?

प्रियांकाच्या या नव्या ब्रॅडमध्ये टेबल क्लॉथपासून ते कपबशीपर्यंत सर्व भारतीय वस्तूंचा समावेश आहे. यात साध्या टेबल क्लॉथची किंमत ३०,६०० रुपये आहे. तर, साधा हात पुसायचा नॅपकिन १४ हजार रुपयांना आहे. त्यामुळे ही किंमत अनेक भारतीयांना खटकली आहे. म्हणून, सध्या प्रियांकाच्या या पोस्टवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
 

Web Title: priyanka chopras homeware brand sona home slammed over ridiculous expensive prices