प्रियांका चोप्राच्या घरी लगीनघाई! भावाचं लग्न ठरलं, सिद्धार्थची होणारी बायको नेमकी कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 08:10 PM2024-04-02T20:10:39+5:302024-04-02T20:10:51+5:30

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे.

Priyanka Chopra's brother Siddharth gets engaged to Neelam Upadhyaya, shares pictures | प्रियांका चोप्राच्या घरी लगीनघाई! भावाचं लग्न ठरलं, सिद्धार्थची होणारी बायको नेमकी कोण आहे?

प्रियांका चोप्राच्या घरी लगीनघाई! भावाचं लग्न ठरलं, सिद्धार्थची होणारी बायको नेमकी कोण आहे?

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राच्या घरी लगीनघाई सुरू आहे. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हा त्याची गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायसोबत लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतेच निलम आणि सिद्धार्थ यांची रोका सेरेमनी पार पडली आहे.  याचे फोटो निलमने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच प्रियांकानंही स्टोरी शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

सिद्धार्थ आणि निलम यांच्या रोका सेरेमनीसाठी प्रियांका चोप्रा नुकतंच भारतात आली होती. प्रियांकाने या फंक्शनसाठी लाल रंगाची साडी नेसली. तर निकने पांढरा कुर्ता-पायजमा आणि गुलाबी जॅकेट परिधान केलेलं दिसून आलं. 

निलमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सिद्धार्थ आणि नीलम हे पारंपारिक लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.  सिद्धार्थने मॅचिंग स्लीव्हलेस जॅकेटसह कुर्ता घातला होता, तर निलमने जांभळ्या टोन्डचा सिक्विन सूट परिधान केला. यात ती अगदी सुंदर दिसून येत आली.

 

सिद्धार्थ चोप्राचा याआधी इशिता कुमारसोबत साखरपुडा झाला होता. पण लग्नाच्या काही दिवस आधी इशिता कुमार आणि सिद्धार्थ यांचं ब्रेकअप झालं. यानंतर सिद्धार्थच्या आयुष्यात नीलमची एन्ट्री झाली. सिद्धार्थ अनेक दिवसांपासून नीलम उपाध्यायला डेट करत होता. मात्र, दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता अखेर दोघेही लवकरच बोहल्यावर चढणार आहेत.  नीलम उपाध्याय ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. तिनं  2012 साली 'मिस्टर 7' या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तमिळ भाषेतील काही चित्रपटांमध्येही तिनं काम केलं आहे.
 

Web Title: Priyanka Chopra's brother Siddharth gets engaged to Neelam Upadhyaya, shares pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.