‘ऐतराज’च्या सीक्वलमधून होणार प्रियांका चोप्राची बॉलिवूड ‘वापसी’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 10:20 IST2018-02-20T04:50:16+5:302018-02-20T10:20:16+5:30
सन २००४ मध्ये आलेल्या ‘ऐतराज’ या चित्रपटातील प्रियांका चोप्राचा बोल्ड रोल चर्चेचा विषय ठरला होता. यातील प्रियांकाच्या अभिनयाचे प्रचंड ...

‘ऐतराज’च्या सीक्वलमधून होणार प्रियांका चोप्राची बॉलिवूड ‘वापसी’!!
स २००४ मध्ये आलेल्या ‘ऐतराज’ या चित्रपटातील प्रियांका चोप्राचा बोल्ड रोल चर्चेचा विषय ठरला होता. यातील प्रियांकाच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. आज इतक्या वर्षांनंतर ‘ऐतराज’ आठवण्याचे कारण म्हणजे, याच चित्रपटाच्या सीक्वलमधून प्रियांका बॉलिवूडमध्ये वापसी करू शकते. होय, अब्बास- मस्तान दिग्दर्शित या चित्रपटाच्या सीक्वलची स्क्रिप्ट फायनल झाली आहे. त्यामुळे यावर्षाच्या अखेरिस ‘ऐतराज’च्या सीक्वलचे शूटींग सुरू होण्याची शक्यता आहे. तूर्तास प्रियांका हॉलिवूडमध्ये बिझी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. न्यूयॉर्कमध्ये ‘क्वांटिको’ या अमेरिकन सीरिजच्या तिस-या सीझनमध्ये प्रियांका व्यस्त आहे.
![]()
१४ वर्षांपूर्वी आलेल्या सुभाष घई निर्मित ‘ऐतराज’ या थ्रीलर चित्रपटाला अब्बास मस्तान यांनी दिग्दर्शित केले होते. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, गत दोन वर्षांपासून घई यांनी या चित्रपटाच्या सीक्वलवर काम सुरू केले होते. गत महिन्यात या सीक्वलची स्क्रिप्ट पूर्ण झाली. या सीक्वलमध्ये प्रियांका चोप्राने काम करावे, अशी घई यांनी इच्छा आहे. आपली ही इच्छा त्यांनी प्रियांकाला बोलून दाखवली. सूत्रांचे मानाल तर प्रियांकालाही ही स्क्रिप्ट ऐकताक्षणीच आवडली े. या सीक्वलमध्ये एक नवी कथा असेल. न्यूयॉर्कमधून प्रियांका परतल्यावर घई तिच्याशी एक फायनल मीटिंग करतील.
‘ऐतराज’साठी प्रियांका चोप्राला बेस्ट अॅक्टर इन निगेटीव्ह कॅरेक्टरचा अवार्ड मिळाला होता. या चित्रपटातील अक्षय व प्रियांकाची केमिस्ट्रीही चांगलीच गाजली होती. या चित्रपटानंतर अक्षय व प्रियांका यांच्या लिंकअपच्या बातम्याही तितक्याच चवीने चघळल्या गेल्या होत्या. त्यामुळे १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा अक्षय व प्रियांकाची जोडी ‘ऐतराज’च्या सीक्वलच्या निमित्ताने एकत्र येते की नाही, ते बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.
अलीकडे एका मुलाखतीत प्रियांकाने आपल्या रिलेशनशिप स्टेट्सबाबत धक्कादायक खुलासा केला होता. वर्षभरापूर्वी अमेरिकेतील एका व्यक्तिसोबत मी सीरिअस रिलेशनशिपमध्ये होती. पण आता मी सिंगल आहे, असे तिने सांगितले होते.
ALSO READ : बॉलिवूड स्टार नाही तर एका अमेरिकन व्यक्तिच्या प्रेमात पडली होती प्रियांका चोप्रा!